उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.
महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान ठाकरे यांनी येणारं सरकार युतीचं येणार आहे, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी जोराने टाळ्या वाजवल्या. यावेळी ठाकरे म्हणाले की, जे करायचं ते खुलेपणाने, दिलखुलासपणे करायचं आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, सत्तेची हाव नाही. राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे.
येणार तर युतीचंच सरकार येणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
“राज्यात युतीचंच सरकार येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र राज्याचा विकास कऱण्यासाठी सत्ता हवी आहे. एक चांगलं आणि मजबूत सरकार राज्यात येणार आहे,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ‘मोदीजी, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधाल हा विश्वास आहे. समान नागरी कायदा देखील तुम्ही आणाल हा विश्वास. ३७७ रद्द झालं; याचा अभिमान आहे. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. मोदी यांच्या रूपाने नेता सापडला आहे. मुंबईला सुविधा देत आहात याचा आनंद आहे. राज्यात युतीचे सरकार येणार. सत्तेचा हव्यास नाही. विकास करण्यासाठी सत्ता हवी’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा उल्लेख केला. मेट्रोचं जाळं पसरवण्याचा श्रीगणेशा गणेशोत्सवात केला जातो आहे. यामुळे मुंबईतल्या पायाभूत सुविधांना नवे आयाम प्राप्त होतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबई असं शहर आहे ज्या शहराने संपूर्ण देशाला गती दिली. आपल्या भाषणात त्यांनी गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा दिल्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं