जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार; उद्धव ठाकरेंचा वृक्षतोडीला विरोध

मुंबई: नाणारचं झालं तेच आरेचं होणार असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला आहे. उद्धव यांनी आज आरेतील वृक्षतोडीवरून भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे, त्यामुळे आगामी काळात आरे कारशेडवरून शिवसेना-भाजपा दरम्यान जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जाहीरपणे विरोध केला आहे. नाणार प्रकल्पाचाही असाच आग्रह धरण्यात आला होता. त्याचं काय झालं तुम्हाला माहीत आहे. जे नाणारचं झालं, तेच आरेचं होणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला.
दरम्यान, काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबत जसा धाडसी निर्णय सरकारने घेतला अगदी तसाच धाडसी निर्णय राम मंदिराच्या निर्मितीबाबत मोदी सरकारने घेतला पाहिजे. राम मंदिराबाबत विशेष कायदा करुन सरकारने हा निर्णय घ्यावा. आता आणखी वेळ घालवू नये आम्ही खूप वेळ वाट पाहिली आहे” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आणि आपलं काश्मीर जे आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशाचा, हिंदुस्थानचा अविभाज्य भूभाग होता, आहे आणि राहील त्याबद्दल धाडसाने केंद्र सरकारने जे पाऊल उचलले तसचं धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा केंद्राने उचलावं अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे.” pic.twitter.com/6x9Y4zAzNd
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 16, 2019
‘राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्यादिवसापासून आग्रही आहे. बाबरी पाडली त्यावेळी देखील संपूर्ण देशात शिवसेनाप्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. ९२ पासून हा विषय सुरू आहे. आणखी आम्ही किती वर्ष थांबायचं?’ असा सवाल त्यांनी यावेळी केला. ‘कोर्टात हा विषय अंतिम टप्प्यात आला आहे असं ऐकतो आहोत. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा’, अशा शब्दांत त्यांनी विनंती केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं