भाजपा सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे; त्यांच्या नव्या ‘फुलोत्पादना'ला शुभेच्छा

मुंबई: दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भारतीय जनता पक्ष सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही असंही सामनातून भारतीय जनता पक्षाला बजावलं आहे.
२०१४ साली दिल्लीच्या ७० टक्के मतदारांनी केजरीवाल यांना म्हणजे आतंकवाद्याला मतदान केले असे भाजपला म्हणायचे आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभांचे मुद्दे तरी काय? बाटला हाऊस आणि कलम ३७०. भारतीय जनता पक्षाने देशाच्या पंतप्रधानांना इतके खाली आणू नये. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना मतदानातून शिक्षा करा असं सामनाने म्हटलं आहे.
मोदी यांचे म्हणणे दिल्लीच्या मतदारांनी उद्या ऐकले नाही तर लाखो मतदार हे देशद्रोही आहेत असे ठरवून नवे येणारे सरकार ते बरखास्त करणार आहेत काय? एकतर अशा चिखलात देशाच्या पंतप्रधानांनी उतरू नये व उतरलेच आहात तर संयम राखा. राजकारण सगळेच करतात, पण विकासाच्या मुद्दय़ावर फार कमी बोलतात. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन केले तरीही ते पराभूत झाले. याचा अर्थ असा की, लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न वेगळे आहेत असं सामनाने नमूद केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली आहे. महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असे भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर त्यात चुकीचे काय? दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी देशभरातले २०० खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतके करूनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी असे चित्र स्पष्ट झाले आहे असं अधोरेखित करण्यात आलं आहे.
Web Title: Shivsena criticized BJP through Saamana Newspaper.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं