उत्तर भारतीयो के सन्मान मे शिवसेना मैदान मे हे सरनाईकांचे नारे | ED'ची धाड पडताच मराठी माणूस?

मुंबई, २५ नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे मारले. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहेत.
प्रत्येक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात ‘उत्तर भारतियो के सन्मान मे शिवसेना मैदान मे’ असे नारे देणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर येताच त्यांच्यासाठी मराठी माणूस अणि मराठी उद्योजक अशी अस्त्र शिवसेना नेत्यांनी बाहेर काढली आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
News English Summary: Pratap Saranaik has revealed. It has nothing to do with the case they are investigating. If it is a crime for a Delhi man to do business in Maharashtra, to do business in Maharashtra, no man in Maharashtra should do business and if you do, then we will eliminate you through ED, Central Investigation Agency. Sanjay Raut has given such a warning.
News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik support Uttar Bharatiya in Thane region news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं