माजी मंत्र्याची सेना सोडण्याची धमकी; पण पक्षासाठी कुचकामी असल्याचं शिवसैनिक म्हणतात

मुंबई: प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले की, सध्या तरी महाविकास आघाडीत आलबेल आहेत असं वाटतं, मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, सगळ्यांना दालनं मिळाली आहेत. मात्र गेल्या जानेवारी महिन्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. राजकारणात खूप गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मिळत नाही. जानेवारीपासून मला कोणतंही काम मिळालं नाही, मी कामासाठी भूकेला आहे. मी काम मागितलं होतं. पण कदाचित उद्धव ठाकरेंच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला काम दिलं नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
तर सध्या मी शिवसेनेचा नेता नाही, उपनेता नाही, विभागप्रमुख नाही माझ्या हातात फक्त शिवबंधन आहे, मी शिवसैनिक आहे. माझी गरज पक्षाला नसेल तर मला सांगावं, मी समाजसेवा करु शकतो. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय आता नाही. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुनच मी निर्णय घेईन असं सांगत दीपक सावंत यांनी शिवसेना सोडण्याची तयारी दर्शविली आहे.
तत्पूर्वी, राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर युवासेनेतून आवाज बुलंद केला होता. त्यावेळी शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर अनेक युवा सैनिक नाराज होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यश संपादन केल्यानंतर युवसेनेतील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
त्यानंतर लगेचच मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्याने अनेकांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे विधानपरिषदेमार्फत मंत्रिमंडळात सामील झाले होते. परंतु त्यावेळी युवा सेनेच्या दबावामुळे त्यांचा पत्ता कट झाला होता आणि मुंबई बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती.
त्यानंतर दीपक सावंत यांनी ताबडतोब ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. विशेष म्हणजे दीपक सावंत हे थेट विधानपरिषदेमार्फत मंत्रिमंडळात स्थान मिळवत असले तरी त्यांचं पक्षवाढीत कोणतंही योगदान नसल्याचं विलेपार्ल्यातील शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यात पक्षसाठी प्रचार आणि स्थानिक पातळीवर साधे नगरसेवक देखील ते निवडून आणू शकत नाहीत असं शिवसैनिकच सांगतात. मात्र आरोग्य मंत्री असताना त्यांनी विलेपार्ल्यात स्वतःच्या कुटुंबियांसाठी पंचतारांकित इस्पितळं उभी केल्याचं स्वतः स्थानिक शिवसैनिकच सांगतात आणि त्यांचा शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा स्वभाव देखील शिवसैनिकांना पटत नसल्याचं म्हटलं आहे.
Web Title: So I can leave Shivbandhan any time says Former shivsena Minister Deepak Sawant.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं