राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार: मुख्यमंत्री

मुंबई, ११ एप्रिल: राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे हे सत्य आहे. पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी १४ तारखेनंतरही लॉकडाऊन ठेवणार असल्याचं त्यांना सांगितले. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केले आहे.
“१४ नंतर ३० एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील पण १४ नंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना मग शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय होणार याची सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला १४ तारखेपर्यंत देणार आहे.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020
‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’ भावगीताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. परिस्थिती गंभीर असताना तुम्हाला गाणे कसं सुचत असे तुम्ही म्हणाला पण सध्याची परिस्थिती ही या गीतासारखी आहे. सर्वांचीच झोप उडाली आहे. कोणीही आमचे तोंड बंद करु शकले नाही पण या विषाणूमुळे सर्वांची तोंडे बंद केली आहेत.
राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे ३३ हजार चाचण्या घेण्यात आल्या असून १५७४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर ३० हजार ४७७ जणांचे निगेटिव्ह आहेत. १८८ रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
News English Summary: It is true that the number of coroners in the state has increased. When I had the opportunity to speak at the PM’s video conference, I told him that I would keep the lockdown even after the 14th. Chief Minister Uddhav Thackeray has announced that lockdown will continue in the state till at least April 30.
News English Title: Story corona virus lockdown will continue Maharashtra after April 14 Chief Minister Uddhav Thackeray announces Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं