Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण | वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण | महाराष्ट्रनामा – मराठी
30 April 2025 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Corona Crisis, Corona Virus, Covid 19, Ajit Pawar

मुंबई, ३१ मार्च: ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.

राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाली आहे. करोना’चं संकट आणि ‘टाळेबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘करोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सर्वाधिक आहेत. हे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मात्र सर्वच थरातून टीका झाल्यावर सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे. त्यानुसार “करोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्यात मिळेल,” असं स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: The Corona crisis and lock down have led to a significant decline in the state’s financial income. The Deputy Chief Minister said that the decision was taken to take into account the decline in the state’s economic income due to the Corona crisis and the ‘lock down’ and also to strengthen the fight against ‘Corona’. The number of coronary infected patients is increasing in Maharashtra. Mumbai and Pune have the highest number of coronary artery disease. Various measures are being taken by the government to prevent this infection. However, the government has clarified after criticism from all levels. Accordingly, “the state’s public health department, medical education, police department, urban development department, rural development department, revenue department against the coronary crisis. The local self-government and the whole system of government are working on the battlefield and there is no question of reducing their wages, ”said Ajit Pawar. However, all officers and employees will get their total payroll in two phases, “it is clarified.

 

News English Title: Story corona virus NCP Deputy CM Ajit Pawar on government decision of pay cut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

x