Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
फसवणूक? ‘महापोर्टल’ ते ‘महाआयटी’….लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली | फसवणूक? ‘महापोर्टल’ ते 'महाआयटी'....लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली | महाराष्ट्रनामा – मराठी
30 April 2025 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

फसवणूक? ‘महापोर्टल’ ते 'महाआयटी'....लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली

Maha IT, Mahapariskha, Maha Portal, Mega Bharti, MPSC, Police Bharti, Talathi Bharti, UPSC

मुंबई, १५ मार्च: तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले होते. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला आणि नव्याने तयारी सुरु केली होती.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाआयटी’तर्फे शासकीय महाभरतीसाठी सक्षम अशा खाजगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसात निविदा प्रसिद्ध केली जाणार होती आणि १५ एप्रिलपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, सामान्य प्रशासनाकडून शासकीय महाभरती कशी राबवायची याबाबत परिपूर्ण परिपत्रक निघेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेगाभरतीला सुरुवात होईल. महाविकास आघाडी सरकारने खाजगी एजन्सीच्या मार्फत भरती करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करून राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील संशय व्यक्त केला होता.

सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून साधारण २ लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या भरतीला २० एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या भरती प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. त्यानंतर, त्यांनी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी, “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले होते.

मात्र महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या ‘महाआयटी’ने विविध विभागांच्या परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले असून, त्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पदभरतीच्या परीक्षा एमपीएसद्वारे घेण्यात याव्यात, या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या; तसेच लोकप्रतिनिधींच्या मागणीला महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली आहे. एकूण पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी नव्या यंत्रणेची निर्मिती करण्यात येईल, असे जाहीर केले होते.

परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या महाआयटी विभागाने शुक्रवारी पदभरती परीक्षा घेण्यासाठी अधिकृत टेंडर काढले असून, त्याची जाहिरात प्रकाशित केली आहे. येत्या ३० मार्चपर्यंत कंत्राट मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी आता नव्या खासगी आयटी कंपनीची नेमणूक होणार असून, त्याद्वारे परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारने पोर्टल बंद करण्याऐवजी तत्कालीन आयटी कंपनी बरखास्त केली होती. आता कंत्राट पद्धतीने नव्या आयटी कंपनीची निवड केल्यावर, एकप्रकारे महापरीक्षा पोर्टलच सुरू होणार आहे. या निर्णयाला उमेदवारांचा तीव्र विरोध होण्याची पुन्हा शक्यता आहे.

दरम्यान, आता पदभरतीच्या परीक्षा आयोजनाची जबाबदारी एमपीएससीकडे न देता, पुन्हा आयटी कंपनीकडे दिल्यावर तीच गोंधळ आणि गैरप्रकारांची मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा एमपीएससीने घ्याव्यात. पुन्हा आयटी कंपनीची नेमणूक झाल्यास, राज्यातील युवक-युवतींचा विरोध राज्य सरकारला सहन करावा लागणार आहे, अशी माहिती एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी दिली.

 

News English Summery: After the closure of the Chief Minister Uddhav Thackeray, who started the Devendra Fadnavis government for the 72,000 Megabharatis in the state, the MahaIT department of the state government is now planning to launch the new company through an IT company. MahaIT has released the tender for the examination of government departments and has released its information. Therefore, the entrance examinations should be conducted by the MPSC, of the candidates preparing for the millions of competitive exams in this state; govt has not listened to demand of the representatives of the people. The last government had created an audit portal through the MahaiT department to conduct the government recruitment examination in a transparent manner. This portal conducts recruitment exams with the help of private IT companies obtained through the contract. However, these tests were misconstrued from the beginning. There was a huge amount of financial misconduct. Therefore, there was confusion throughout the state in the tests conducted by the audit portal. The government then decided to close the portal. However, at that time it was announced that a new system would be created for the recruitment examination.

 

Web News Title: Story Maha IT Mahapariksha Mahaportal Tenders for Maharashtra Government exams News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

x