फक्त राज्यात कशाला? लोकसभा निवडणूक सुद्धा होऊन जाऊ द्या: शरद पवार

मुंबई: ‘हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असे आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘फक्त राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या. आमची काहीच हरकत नाही.’, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलं होतं. त्यावर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल, असं फडणवीस म्हणाले होते. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी फडणवीसांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. ‘फक्त महाराष्ट्रातच कशाला? लोकसभेचीही निवडणूक घ्या. होऊन जाऊ द्या,’ असं पवार म्हणाले.
तत्पूर्वी, ‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असं फडणवीस म्हणाले होते.
Web Title: Story NCP President Sharad Pawar challenges former CM Devendra Fadnavis face Loksabha Election again.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं