सरकारी अनास्था! मृत्यू पूर्वी त्या पोलिसाला ४-५ सरकारी रूग्णालयात फिरवण्यात आलं

मुंबई, २७ एप्रिल : कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, हे कळवण्यास मुंबई पोलिसांना अत्यंत दुःख होत आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आमची सद्भभावना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम राहील.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 27, 2020
तत्पूर्वी जे घडलं त्याबद्दल धक्कादायक माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली असून, त्यातून सरकार दरबारी पोलिसांची अनास्थाच सुरु आहे असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी अचानक तब्बेत बिघडल्यामुळे शिवाजी सोनावणे यांचा मुलगा त्यांना प्रथम खासगी क्लिनिकमध्ये घेऊन गेला. त्यानंतर जवळपास ४ ते ५ सरकारी रूग्णालयात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फिरवण्यात वेळ वाया घालवला आणि अखेर त्यांची आज मृत्यूशी झुंज संपल्याची बातमी आली आहे.
घटनाक्रमानुसार माहिती अशी की, अचानक ताप येऊन लागल्यामुळे त्यांना खासगी आणि नंतर राजावाडी ते कस्तुरबा..मग कस्तुरबा ते नायर…मग पुन्हा नायर ते केईएम असं नेण्यात आलं. यावेळी केईएममध्ये त्यांना पोलिसांच्या मध्यस्तीने दाखल करण्यात आलं सकाळी ९ वाजता घराबाहेर पडलेले हे पोलिस शिपाई रात्री १० वाजता रूग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सामान्य लोकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पोलीस यंत्रणेबाबत कृतज्ञता व्यक्त करत असले तरी सरकारी इस्पितळांमध्ये पोलिसांची अनास्था सुरु असल्याचं त्यांचे जवळचे लोकं सांगतात.
News English Summary: Shivaji Narayan Sonawane, a 56-year-old police constable of the Kurla Transport Department, has died while battling a coronavirus, according to the official Twitter handle of the Mumbai Police.
News English Title: Story Police covid 19 affected not getting good treatment at government hospitals News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं