शीना बोरा हत्या: 'त्यांनी' फडणवीसांना चुकीची माहिती दिली होती: राकेश मारिया

मुंबई : मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या अचानक झालेल्या बदलीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी तपासादरम्यान आरोपी पीटर मुखर्जी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असा मारिया यांच्यावर आरोप होता. पीटर आपली पहिली पत्नी इंद्राणीची मुलगी शीना हिच्या हत्येचे आरोपी आहेत.
‘सुपरकॉप’ अशी इमेज असलेल्या मारिया यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर एकूण पोलीस दल, कारकीर्द याबाबत काहीही भाष्य केले नव्हते. मात्र ‘लेट मी से इट नाऊ’ या आगामी पुस्तकात त्यांनी सगळं काही सांगत शीना बोरा प्रकरणावरही विस्तृत लिखाण केले आहे. एका मासिकाशी बोलताना त्यांनी अद्याप गुलदस्त्यात असलेली माहिती मांडली आहे.
शीना बोरा हत्या प्रकरण २०१५ मध्ये पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिला अटक केली. इंद्राणीवर शीनाच्या हत्येचा आरोप होता. हे प्रकरण खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राकेश मारिया मुंबई पोलीस आयुक्त होते. यादरम्यान इंद्राणी व पीटर मुखर्जी यांची जोरदार चौकशी केली होती.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपासाच्या सुरुवातीला, एकदाच या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली होती. त्यात कुठेही पीटरचा या हत्याकांडात सहभाग नाही, असा उल्लेख नव्हता. शीनाची हत्या झाली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली तेव्हा पीटर प्रत्यक्ष उपस्थित नव्हता. मात्र त्याच्या सहभागाबाबत सर्व बाजूने चौकशी-तपास सुरू आहे, अशी माहिती फडणवीस यांना दिल्याचे मारिया यांनी या प्रकरणात नमूद केले आहे. पुराव्यादाखल फडणवीस यांना केलेल्या लघुसंदेशांतील तपशीलही मारिया यांनी या प्रकरणात घेतले आहेत.
Web Title: Story Sheena Bora assassination Former CM Devendra Fadnavis misinformation was given to former Mumbai commissioner.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं