मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याजवळच्या चहावाल्याला कोरोना

मुंबई, ६ एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने सोमवारी खळबळ उडविली. त्या चहा विक्रेत्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून तो रस्ता बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. मातोश्री परिसरात असलेल्या एका चहावाल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यावरच त्याला कोरोनाची लागण झाली का? हे स्पष्ट होणार आहे. मात्र या विभागात मुख्यमंत्री राहत असल्याने हा रस्ता बंद करून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले. तातडीने या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
News English Title: While the outbreak of Corona is increasing rapidly in Mumbai, the residence of Chief Minister Uddhav Thackeray has not escaped. Talks on the back of Mathashri bungalow in Thandre, Bandra, triggered a spate of reports of a corona infection at a tea vendor on the back road. The test report for that tea seller has not yet arrived. But as a precaution, the road has been closed and sterile.
News English Title: Story tea vendor near Maharashtra Chief Minister Private residence tests positive to Corona virus BMC Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं