माझा संयम सुटला तर? तुमच्या या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घ्यायचा, भाजप आक्रमक

मुंबई, ६ ऑगस्ट: यापूर्वी देखील भाजप तसेच चित्रपट श्रुष्टीतील अनेकांनी आदित्य ठाकरे यांना सुशांत प्रकरणावरून लक्ष केलं आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर हाच विषय ट्रेंडिंगमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे. परिणामी आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी त्यांनी समाज माध्यमांवर एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे.
याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात होतं की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते, आमदार अतुल भातखळकर यांनी, आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घ्यायचा, असा सवाल केला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर पत्रक शेअर करून आपले मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर;
बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत व तो काही गुन्हा नाही. सुशांत सिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य यांच्या या वक्तव्यावरून भाजपच्या एका मंत्र्याने, ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची गरज आहे. आदित्य यांच्या एका सहकाऱ्यावर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण, असे भातखळकर यांनी विचारले आहे.
‘मी आजही संयम ठेवलेला आहे’…
या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल. pic.twitter.com/0nlhocBEXZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 5, 2020
News English Summary: BJP leaders have been aggressive in their response to the allegations against Environment Minister Aditya Thackeray. BJP’s Maharashtra spokesperson, MLA Atul Bhatkhalkar, has questioned how people should interpret Aditya Thackeray’s statement.
News English Title: Sushant Singh Rajput suicide case BJP again target environment minister Aaditya Thackeray News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं