सुशांत प्रकरण | रियाची ईडी कार्यालयात संध्याकाळपर्यंत चौकशी होण्याची शक्यता

मुंबई, ०७ ऑगस्ट : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केल्याचं तिचेकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं. सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाची आज चौकशी सुरु आहे. बुधवारी आणि गुरुवारी सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची ईडीने चौकशी केली. काल तब्ब्ल ९ तास सॅम्युअलची चौकशी करण्यात आली. दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असं म्हटलं. तसंच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. रियाने करोडो रुपये प्रॉपर्टी खरेदीसाठी वापरल्याचा आरोप केला जात आहे. तसेच रियाचा भाऊ शोविकची देखील ईडी चौकशी करू शकते.
News English Summary: Sushant Singh’s suicide case has taken a new turn. Sushant’s alleged girlfriend Rhea Chakraborty has been found in a double whammy of investigation. The CBI has registered a case against seven persons, including Rhea Chakraborty, and the ED will also probe Rhea today.
News English Title: Sushant Singh Rajput suicide case Rhea Chakraborty reaches ED office for questioning News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं