मास्तर म्हणाले तू नापास होणार, पोरग पास झालं, मग काय मिरवणूक काढून थेट मास्तराला ठस्सन

मुंबई : एका खासगी क्लासच्या मास्तरांनी त्याच्या पठ्याला तू दहावीला काय पास होणार नाही म्हणून सांगितलं होत. मास्तर रोज हिणवायचे प्रगती बघून. पण मुलगा पण मोठा जिद्दी निघाला आणि ठासून अभ्यास केला आणि चक्क ५१ टक्के मिळवून दहावीला पास पण झाला. पठ्याला मेरिट मध्ये आल्याचा आनंद तर झालाच, पण मित्र पण जाम खुश झाले आपल्या दोस्तांवर आणि ठरलं तर मग थेट मास्तराच्या क्लासच्या समोरूनच मिरवणूक काढून मास्तरांनाच ठस्सन दिली पठ्यानं.
हा प्रकार घडला आहे मुंबईतल्या कांजूरमार्ग मध्ये आणि पास होणाऱ्या पठ्याचा आणि मित्रांचा आनंद पाहून परिसरातील लोकांना वाटलं की पोरगा मेरिट मध्ये आला असावा. पण नंतर वास्तव समजताच एकच हसू फुटलं सर्वांना आणि आनंद असा की ‘जो जिता वही सिकंदर’ या पेक्षा अजून दुसरे शब्दच नव्हते उपस्थितांकडे.
एकूणच विद्यार्थी अभ्यासात कमकुवत असतील म्हणून शिक्षकांनी सुद्धा मुलांना ‘तू नापास होणार’ असे मथळे सर्वासमोर मारणं बंद केलं पाहिजे. परंतु मास्तर आणि विध्यार्थ्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्याने बाजी मारली हे सत्य आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं