ईडीची धाड महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं - भुजबळ

मुंबई, २४ नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीनं ताब्यात घेतलं असून धाडसत्र सुरूच आहे.
‘शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं,’ अशी शंका व्यक्त करतानाच, ‘कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,’ असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,’ असं भुजबळ म्हणाले.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांना न आवडणारं बोललं की विरोधकांना त्रास देण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. मागे आम्ही जास्त बोललो तर आम्हाला त्रास दिला गेला. पवार साहेब बोलले तर त्यांना ईडीची नोटीस पाठवली गेली. कंगना राणावत सारख्या काही प्रकरणांत प्रताप सरनाईक आपल्या पक्षाच्या बाजूनं बोलत होते. त्यामुळं त्यांच्या विरोधातही असं काही होईल असं वाटतंच होतं. तसं ते होतंय. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी हे सगळं केलं जातंय,’ असं भुजबळ म्हणाले.
News English Summary: The action against Shiv Sena MLA Pratap Saranaik may be the first step of ‘Operation Lotus’ in Maharashtra,’ said Chhagan Bhujbal, Minister of State for Food and Civil Supplies. Did. ‘Actor Sushant Singh Rajput was speaking very aggressively in Sarnaik in suicide and other cases. Was defending the government. Therefore, this action was expected, ‘said Bhujbal.
News English Title: This may be first step towards operation lotus says Minister Chhagan Bhujbal News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं