मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद, राज्यभर दमदार पाऊस

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २३१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईमधील पाणी साचण्याच्या सर्वाधिक घटना या माटुंगा, दादर, किंग्ज सर्कल आणि हिंदमाता परिसरात घडल्या आहेत. कारण हा भाग भौगोलिक दृष्ट्या सखल समजला जातो. परंतु त्यामुळे स्थानिकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाणे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन पथकाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुंबईतील पावसाचा असाच कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं