खुशखबर! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक तुलशी तलाव पूर्ण भरलं आहे

मुंबई : मुंबईमध्ये दोन तीन दिवसांपासून बरसणाऱ्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांपैकी एक तलाव म्हणजे तुलशी तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. कारण गेल्यावर्षी हाच तलाव पूर्ण भरण्यासाठी ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली होती.
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या माहिती नुसार तुळशी तलाव आज सकाळी साडेसात वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे आणि पूर्णपणे भरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा तलाव एक महिना लवकर भरल्याचे प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
एकूणच गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली असली तरी ही एक बातमी मुंबईकरांना सुखावणारी ठरली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं