ठाकरेंची नवी पिढी; सत्तेमुळे आदित्य यांना अधिक संधी पण अमित यांच्यापुढे केवळ आव्हानं: सविस्तर वृत्त

मुंबई: ठाकरे घराण्यातील नवी आणि तरुण पिढी आता पूर्णपणे राजकारणात उतरली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही तरुण नेते आज सक्रिय राजकारणात आले असले तरी दोन्ही बाजूंचा विचार करता लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची सर्वाधिक संधी ही आदित्य ठाकरे यांनाच आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे राज्याची आणि राज्यातील महत्वाच्या महानगर पालिकांची सत्ता आज शिवसेनेकडे आहे. त्यात स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे स्वतः मंत्रिपदावर हेच कारण आहे.
मात्र दोघांच्या राजकारणाची सुरुवात पाहता आदित्य ठाकरे यांना जितक्या सहज पक्षात नेते पद आणि थेट युवासेनेचे अध्यक्ष पद मिळालं तसंच अमित ठाकरेंच्या बाबतीत देखील घडलं आहे. मात्र जेव्हा आदित्य ठाकरे यांना युवासेना अध्यक्षपद मिळालं तेव्हा शिवसेना सत्तेत नसली तरी त्यांच्याकडे ९-१० खासदार, ५०-६० आमदार आणि शेकडो नगरसेवकांचा आकडा होता. त्या तुलनेत मनसेच्या स्थापनेपासूनचा विचार करता २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश पक्षाला पुढे टिकवता किंवा वाढवता आलं नाही. मात्र आज राजकीय दृष्ट्या मनसे पक्ष अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जाताना दिसत आहे आणि त्याच काळात अमित ठाकरे यांना नेते पद बहाल करण्यात आलं आहे.
आज अमित ठाकरेंकडे नेते पद आलं असलं तरी, त्यांना स्वतःहून काही निर्णय घेण्याचे आणि ते अमलात आणण्याचे किती अधिकार देण्यात आले आहेत ते पाहावं लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जवळपास १ कोटी २५ लाखांच्या घरात मतं पडली आणि तो त्यांचा संपर्क समजावा लागेल. मराठी माणसासोबत रोजच्या संपर्काचं सामना’सारखं आणि हिंदी भाषिकांसाठीचं ‘दोपहार का सामना’ सारखं संपर्काची दोन माध्यमं एक शक्तिस्थळ आहे. परंतु, मनसेकडे सामान्यांशी जोडणारं असं रोजच्या संपर्काचं कोणताही माध्यम नाही हे वास्तव आहे. त्यामुळे टीआरपी’च्या नादात टीव्ही वाहिन्यांवर १-२ दिवसांसाठी मनसेचा विषय रंगतो आणि त्यानंतर सर्वकाही शांत होतं. तसंच शिवसेनेच्या तुलनेत स्थानिक पातळीवर मनसेची पक्षबांधणी अत्यंत कमकुवत असल्याने निवडणुकीच्या काळात अडचणी निर्माण होतात.
आजच्या घडीला हिंदुत्वाचं राजकारण करा किंवा धर्मनिरपेक्ष, पक्ष बांधणी आणि रोजचं सामान्य लोकांशी संपर्काचं साधन हे पक्ष टिकविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अनिवार्य आहे. आदित्य ठाकरे आज सत्तेच्या आणि अर्थकारणाच्या बळावर निरनिराळा विषयांना हाताळून स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी वाया घालवतील असं वाटत नाही. मात्र अमित ठाकरे कशाच्या बळावर स्वतःला सिद्ध करतील हे पाहावं लागणार आहे. कारण मनसेत नेते पद बहाल केल्यावर त्यांनी एक प्रस्ताव मांडताना शिक्षण व्यवस्थेतील बदल, क्रीडा विद्यापीठ आणि राज्यातील तरुण-तरुणींसाठी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभी करण्याचा मानस बोलून दाखवला.
अमित ठाकरेंच्या प्रस्तावातील तिन्ही विषय चांगले असले तरी त्यातील वास्तव समजून घेतल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील जे वास्तवाला धरून आहेत. त्यातील पहिल्या दोन विषयांचा विचार केल्यास, त्यापैकी शिक्षण व्यवस्थेतील बदल आणि क्रीडा विद्यापीठ असे विषय तडीस घेऊन जायचे असल्यास प्रथम त्यासाठी सत्ता हातात असणं गरजेचं आहे आणि मनसेसाठी ते कमीत कमी ते २०२४ पर्यंत तरी शक्य नाही. त्यानंतर तिसरं म्हणजे राज्यातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांचा ऑनलाईन अभ्यास करता यावा म्हणून एक यंत्रणा उभी करणं. परंतु, त्यावर पक्षाने कोणतं संशोधन केलं आहे का? कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्यात तलाठी ते आयएएस अधिकारी अशा राज्यस्तरीय आणि केंद्रीय पातळीवरील सर्वच परीक्षा येतात. त्यात संशोधनाप्रमाणे राज्यात प्रतिवर्षी तब्बल १ कोटी ५० लाख तरुण विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर दुसरीकडे देश पातळीवरील अशा तरुणांचा आकडा जवळपास ७ कोटीच्या घरात आहे आणि त्यात ग्रामीण भागातील तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
उद्या याच तरुणांसाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन अभ्यासाची यंत्रणा उभी करायला कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान उभं करावं लागेल याची मनसेकडे काही माहिती आहे का आणि त्यासाठी कशा प्रकारचं सर्व्हर मॅनेजमेंट लागेल याबद्दल किंचतही माहिती आहे का? हेच मुळात संशोधनाचं काम आहे. कारण सध्या मनसेशी संबंधित दोन पोर्टल्स आहेत आणि त्याबद्दल ‘अनॅलिटीक्स’च्या रिपोर्टनुसार न बोललेलंच बरं. त्यात स्पर्धा परीक्षांच्या माहितीचा ‘डेटाबेस’ हा अरबो’मध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि तो अद्यावत ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि त्याची मनसेकडे उपलब्धता आहे का? हे देखील विचार करायला भाग पडणारं आहे.
त्यात मराठी युवक-युवती राज्यस्तरीय आणि केंद्रीय पातळीवरील सर्वच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास १२ महिने करत असतात. पण मनसेकडे केंद्रीय आणि राज्यस्तरीय सर्व परीक्षांचा अभ्यास करण्याची ऑनलाईन यंत्रणा उभी करण्याची खरंच इच्छा आहे की केवळ प्रस्ताव मांडण्यासाठी काही विषय असावा म्हणून ते सांगण्यात आलं ते कालांतराने सिद्ध होईल. मात्र हे तिन्ही विषय अमित ठाकरेंनी प्रस्तावात मांडल्याने त्याबद्दल प्रसार माध्यमं अमित ठाकरेंना कालांतराने टोचण्यास सुरुवात करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यापुढे प्रचंड आव्हानं असून पक्षाने आणि वरिष्ठांनी त्यांच्याबातीत देखील ‘वेळमारु’ नीती अवलंबल्यास तो त्यांच्या भविष्यातील राजकारणाला स्वतःच लावलेला सुरुंग असेल. परिणामी त्यांच्या पिढीपुढे राज ठाकरेंच्या कठीण काळापेक्षाही मोठी आव्हानं उभी राहतील. कारण सोशल मीडिया सर्वकाही रेकॉर्डेड ठेवतो आणि अमित ठाकरेंच्या प्रस्तावातील हेच विषय त्यांच्या चर्चेचे विषय बनतील हे नक्की आहे. त्याच वेळी २०२४ नंतर आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि अजित पवारांच्या राजकीय ताकदीने पार्थ पवार यांची राजकीय गाडी मात्र सुसाट निघालेली पाहायला मिळेल.
Web Title: Vision and challenges of Aaditya Thackeray and Amit Thackeray in politics .
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं