व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून नागरिकांवर पाळत ही हुकूमशाहीच: राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: काही दिवसात प्रसार माध्यमातून स्क्रुटिनचा प्रकार धुमाकूळ घालतोय. एनएसआय कंपनीमार्फत देशातल्या काही लोकांच्या माहिती काढल्या जात आहेत, गुजरातमध्ये मागच्या काळात घेडलेला हा प्रकार घडला होता, आता इतर ठिकाणीही घडतोय ही चिंतेची बाब आहे. चौदाशे लोक फेसबुकवर आहेत ज्यांच्यावर यावरून नजर होती. सॉफ्टवेरमार्फत पाळत ठेवली जाते हे फेसबुकने आधी सांगितले होते. याबाबत संपूर्ण माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती, याबातची मीहिती केंद्र सरकारने सर्वांसमोर आणावी असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
इस्राइली स्पायवेअर, पेगॅससचा उपयोग करून एनएसओ ग्रुपने भारतातील अभ्यासक, दलित कार्यकर्ते, वकील आणि पत्रकारांचे फोन हॅक करून त्यांच्यावर हेरगिरी केल्याची बाब उघड झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे – आ. @Jayant_R_Patil @Awhadspeaks @MahebubShaikh20 @ravikantvarpe #WhatsApp pic.twitter.com/piWKAeBw7T
— NCP (@NCPspeaks) November 4, 2019
गुन्हेगारांवर पाळत ठेवली असती तर समजू शकलो असतो. पण पत्रकार, दलित संघटनेचे नेते आणि बुद्धिजीवींवर पाळत ठेवण्याचं कारण काय, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हेरगिरी करणाऱ्या एजन्सीनं आपण याबद्दलचं तंत्रज्ञान केवळ सरकारला विकत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून झालेली हेरगिरीमागे सरकारचा हात असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला.
प्रसार माध्यमातून स्निफिंगचा प्रकार वाढत आहे. एनएसओ कंपनीमार्फत देशातील काही लोकांची माहिती काढली गेली आहे, त्याच्या बातम्या जागतिक स्तरावर आल्या आहेत. पाळत ठेवण्यात येणाऱ्या ४० लोकांची नावे उघड करण्यात आली त्यात १४ लोक महाराष्ट्रातील आहेत – आ. @Jayant_R_Patil@Awhadspeaks pic.twitter.com/36HASk9gcf
— NCP (@NCPspeaks) November 4, 2019
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आपल्याच देशाच्या नागरिकांवर ठेवली जाणारी पाळत ही मागच्या दारानं येणारी हुकूमशाही असल्याचा दावा त्यांनी केला. हेरगिरीसाठी आवश्यक असणारं स्पायवेअर आम्ही फक्त सरकारला देतो, असा संबंधित कंपनीचा दावा आहे. त्यामुळे हेरगिरी कोणी केली हे उघड आहे. यावेळी बोलताना एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. गुजरातची संस्कृती देशभरात नेण्याचा प्रयत्न सध्या काहींकडून सुरू आहे. संजय जोशी कोण होते, त्यांचं पुढे काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. त्यावेळी जे जोशींसोबत झालं, तेच आता व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सुरू आहे, असं आव्हाड म्हणाले.
फोनद्वारे लोकांवर पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे. याची माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती. केंद्र सरकारने कुणाला मान्यता दिली होती का, कुणाच्या आदेशाने पाळत ठेवण्यात आली याची माहिती समोर आली पाहिजे. त्यामुळे सरकारने याबाबत खुलासा करण्याची गरज आहे – @Jayant_R_Patil pic.twitter.com/5RgqBOmELP
— NCP (@NCPspeaks) November 4, 2019
अशाप्रकारे लोकांच्या फोनमधील माहिती मिळवून, दबाव आणण्याचे काम सरकारकडून होतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे लोकांच्या खासगी जीवनावर सरकारी अतिक्रमण आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे – @Jayant_R_Patil @Awhadspeaks pic.twitter.com/4u622hIrvs
— NCP (@NCPspeaks) November 4, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं