Multibagger Mutual Funds | या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना कोटीत परतावा देत आहेत, नावं नोट करा आणि रेकॉर्डब्रेक परतावा कमवा

Multibagger Mutual Funds | जगातील सर्व शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर आपल्याला समजेल की, जे गुंतवणुकदार दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात, ते अप्रतिम परतावा कमावतात. हेच कारण आहे की दिग्गज गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील तज्ञ नेहमी दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणुकदार वॉरन बफे नेहमी म्हणतात की जर तुम्ही 10 वर्षे गुंतवणूक होल्ड करून ठेवू शकत नसाल, अजिबात गुंतवणूक करू नका. शेअर बाजार तज्ञांचे मत आहे की, जी तुम्हाला गुंतवणुकीतून चक्रवाढीचा फायदा घ्यायचा असेल, तर म्युचुअल फंडात पैसे गुंतवून संयम ठेवा, तुम्हाला संयमाचे फळ दीर्घकाळात नक्की मिळेल. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर तुम्ही संयम राखु शकला नाही, तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
शेअर बाजारात पैसे लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमची गुंतवणूक जितकी जास्त असेल, तुमचा नफाही तेवढा जास्त असेल. जर तुम्ही इक्विटी मार्केटचा चार्ट पॅटर्न पाहिला तर तुम्हाला समजेल की दीर्घकालीन गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, अल्पकालीन गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त असतो. उच्च परतावा देणार्या म्युचुअल फंडात पैसे लावून गुंतवणूकदार 5 वर्षांत दुप्पट किंवा 10 वर्षांत 4 ते 5 पट अधिक परतावा कमवू शकतात. मार्केटमध्ये अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये सरासरी वार्षिक 15 ते 18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक जितकी जास्त काळ टिकुन राहील चक्रवाढ व्याजाचा फायदाही तितकाच जास्त होतो. या लेखात आपण कामगिरीच्या आधारावर उच्च परतावा देणाऱ्या काही म्युचुअल फंड योजनांचा आढावा घेऊ.
HDFC टॉप 100 म्युचुअल फंड :
HDFC टॉप 100 म्युचुअल फंडाने 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 12 टक्के, 11.5 टक्के, 21 टक्के वार्षिक सरासरी परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या योजनेत दरमहा 5000 रुपयांची SIP गुंतवणूक केली तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 वर्षांनंतर 11.5 लाख, 15 वर्षांनंतर 24 लाख आणि 20 वर्षांनंतर 1.8 कोटी रुपये झाले असते.
SBI लार्ज आणि मिडकॅप म्युचुअल फंड :
SBI लार्ज अँड मिडकॅप म्युचुअल फंडाने 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 16.5 टक्के, 12 टक्के, 23 टक्के वार्षिक सरासरी परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत जर तुम्ही दरमहा 5000 रुपयांची SIP गुंतवणूक केली तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 वर्षांनंतर 15.3 लाख, 15 वर्षांनंतर 25.2 लाख आणि 20 वर्षांनंतर 2.3 कोटी रुपये झाले असते.
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंड :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंडाने 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 16.5 टक्के, 12.5 टक्के, 24.5 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात जर तुम्ही दरमहा 5000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 वर्षांनंतर 15.3 लाख, 15 वर्षांनंतर 26.5 लाख आणि 20 वर्षांनंतर 3.2 कोटी रुपये झाले असते.
क्वांट अॅक्टिव्ह म्युचुअल फंड :
क्वांट अॅक्टिव्ह म्युचुअल फंडाने 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 20 टक्के, 12 टक्के, 20.46 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात जर तुम्ही दरमहा 5000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 10 वर्षांनंतर 19.2 लाख रुपये, 15 वर्षांनंतर 25.2 लाख रुपये आणि 20 वर्षांनंतर 1.7 कोटी रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Mutual funds which has given huge returns in long term investment on 16 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं