Stop SIP Investment | तुम्ही घरबसल्या तुमची म्युच्युअल फंड SIP थांबवू शकता, जाणून घ्या सोपी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया

Stop SIP Investment | SIP म्हणजे ही म्युचुअल फंड मधील एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही विशिष्ट अंतराने पूर्व निर्धारित म्युच्युअल फंड योजनेत एक निश्चित रक्कम दर महिन्याला गुंतवता, यालाच SIP म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची म्युचुअल फंड SIP थांबवायची असेल तर तुम्ही ती कोणत्याही किचकट प्रक्रिये शिवाय, कोणत्याही वेळखाऊ प्रक्रियेला सामोरे न जाता ही थांबवू शकता किंवा रद्द करू शकता.
काही प्रतिकूल परिस्थितीमुळे तुम्ही तुमची SIP गुंतवणूक चालू ठेवू इच्छित नाही, किंवा तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला हे करू देत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही SIP थांबवण्याचा पर्याय देखील निवडू शकता. तथापि, असा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन प्रक्रिया :
यासाठी, तुम्ही तुमच्या म्युचुअल फंडाच्या वेबसाइटवर भेट द्या. आणि लॉग इन करा आणि तुमच्या पोर्टफोलिओचे तपशील सबमिट करा. यासाठी तुम्ही R&D एजंट किंवा वितरकाच्या ऑनलाइन व्यवहार प्लॅटफॉर्मवरही लॉग इन करू शकता. तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या SIP ची निवड करा जी तुम्हाला थांबवायची आहे. Cancel or Stop SIP वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा.
ऑफलाइन प्रक्रिया :
ऑफलाइन पद्धतीने SIP बंद करण्यासाठी, तुम्हाला स्टॉप SIP चा फॉर्म भरावा लागेल. म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवरून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म भरल्यावर तुमच्या म्युचुअल फंड संस्थेच्या ऑफिस मध्ये जाऊन सबमिट करा. यानंतर पोचपावती घ्या. या फॉर्ममध्ये एसआयपी तपशील, पोर्टफोलिओ क्रमांक, पॅन क्रमांक भरावा लागेल. त्यावर स्वाक्षरी करा आणि फॉर्म सबमिट करा. विनंती प्राप्त झाल्यानंतर काही काळानंतर तुमची एसआयपी गुंतवणूक बंद होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Online and offline procedure to Stop SIP Investment on 8 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं