SIP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची योजना, 2500 रुपयांची मासिक SIP देईल 1.18 करोड रुपये परतावा

SIP Mutual Fund | तुमच्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल की, आपण कोटींच्या घरात पैसे कमवावे किंवा एकदा तरी कोट्यधीश बनून आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या. काहींचे हे स्वप्न स्वप्नच राहते. परंतु तुम्ही तुमचे स्वप्न अगदी सहजरीत्या पूर्ण करू शकणार आहात. ते सुद्धा एसआयपी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून.
ज्या व्यक्तींना करोडपती बनायचं आहे त्यांच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड हा अत्यंत फायद्याचा पर्याय ठरेल. एसआयपी माध्यमातून तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ मिळवू शकता. असाच दीर्घकालीन आणि फायदा मिळवून देणारा एसबीआयचा एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी फंड आहे. या फंडामध्ये अगदी कमी गुंतवणुकीपासून सुरुवात करून मोठा फंड तयार होऊ शकतो.
असे बनाल करोडपती :
समजा एसबीआयच्या ‘हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी’ फंडात एखाद्या व्यक्तीने 25 वर्षाआधी 2,500 रुपयांची मासिक एसआयपी केली असती तर, सध्याच्या घडीला तो 1.18 करोडोंचा मालक असता. म्हणजेच तुम्हाला करोडपती बनण्यास केवळ 25 वर्षांचा कालावधी लागेल यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पुढील 25 वर्षांच्या सातत्याच्या गुंतवणुकीमध्ये 2,500 रुपयांची रक्कम गुंतवावी लागेल. गुंतवणूकदार 2500 रुपयांच्या हिशोबाने 25 वर्षांत केवळ 7.50 लाखांची गुंतवणूक करतो. परंतु चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवून 1.18 कोटींचा कॉर्पस तयार होतं.
ज्या व्यक्तीला नोकरी लागल्याच्या 25 वर्षानंतर स्वतःच्या स्वप्नपूर्ती साकार करायच्या असतील त्याच्यासाठी एसबीआयचा हा फंड अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
योजनेची खास गोष्ट जाणून घ्या :
एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड 1999 साली जुलै महिन्यात सुरू झाला होता. हा फंड पूर्णपणे फार्मा सेक्टर आणि हेल्थ सर्विसवर डिपेंड आहे. योजना लॉन्च झाल्यानंतर 18% टक्क्यांचा परतावा मिळवून दिला होता. हा परतावा वार्षिक आधारावर असल्यामुळे फार कमी वेळात लोकप्रिय झालेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Mutual Fund SIP 27 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं