SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या

SIP Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड एसआयपीमधील गुंतवणूक झपाट्याने वाढत चालली आहे. बहुतांश व्यक्ती दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी गुंतवणुकीकडे वळाले आहेत. जास्त करून भविष्यात मोठी संपत्ती तयार करण्याच्या दृष्टिकोनाने लोक एसआयपी गुंतवणुकीत सहभाग दर्शवत आहेत.
तुम्ही महिन्याला अगदी 500 रुपयांपासून एसआयपी गुंतवणूक सुरू करून कोटींच्या घरात पैसे कमवू शकता. तुमची गुंतवणूक जितकी दीर्घकाळ टिकेल इतक्याच प्रमाणात तुमचा कॉर्पस वाढत जाईल. आज आम्ही तुम्हाला 500 रुपयांची मासिक एसआयपी सुरू करून 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांत किती परतावा मिळू शकतो हे सांगणार आहोत.
5 वर्षांचे गणित :
एसआयपी गुंतवणुकीतून तुम्हाला वार्षिक आधारावर 12% व्याजदर मिळते. 12% व्याजदर अनुसार तुम्ही 5 वर्षांसाठी 500 रुपयांची मासिक गुंतवणूक करत असाल तर, तुम्ही एकूण 30000 रक्कम गुंतवाल. 12% व्याजदरानुसार तुम्हाला व्याजाने 11243 रुपये मिळतील. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात 41,243 रुपये येतील.
10 वर्षांचे गणित :
दहा वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची एसआयपी सुरू केली तर, तुम्ही एकूण 10 वर्षांच्या कार्यकाळात 60 हजार रुपये गुंतवता. गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला बारा टक्के दरानुसार 65,170 रुपयांचे व्याज मिळते. मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर तुमच्या खात्यात 1,61,170 रुपये परतावा मिळतो.
20 वर्षांचे गणित :
सलग मासिक 500 रुपयांची एसआयपी 20 वर्षांसाठी केली असल्यास 20 वर्षांत तुमच्या खात्यात 1,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. 20 वर्षांच्या दीर्घकाळात तुम्हाला 12 टक्के दराने दुप्पटीने व्याजदर मिळेल. 3,79,574 रुपये व्याजाने मिळतील. 20 वर्षांत तुमच्या खात्यात व्याजदर आणि गुंतवलेली रक्कम मिळून 4,99,574 रुपयांचा परतावा मिळेल.
25 वर्षांचे गणित :
एकूण 25 वर्षांत तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची एसआयपी करत असाल तर, तुमच्या खात्यामध्ये 1,50,000 रुपयाची रक्कम जमा होईल. या रक्कमेवर तुम्हाला 25 वर्षांच्या 12% वार्षिक व्याजदराच्या हिशोबाने 7 लाख 98 हजार 818 रुपयांचे व्याज मिळेल. आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 9,48,818 रुपये मिळतील. दीर्घकाळात एस आय पी च्या माध्यमातून तुम्हाला मजबूत परतावा मिळवता येईल. दरम्यान 30 वर्षांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला गुंतवणूक आणि व्याजदरातून मिळणारा एकूण परतावा 17,64,957 रुपये मिळतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SIP Mutual Fund Tuesday 28 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं