SIP Vs PPF | एसआयपी की PPF तुमच्यासाठी गुंतवणुकीचा कोणता पर्याय ठरेल उत्तम, जाणून घ्या करोडपती बनण्याचा राजमार्ग

SIP Vs PPF | प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील काही रक्कम भविष्याकरिता साठवून ठेवतो. अचानक गरजेवेळी मोठी रक्कम काही कारणांमुळे उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपण आधीच सेफ साईड म्हणून बचत करणे महत्वाचे आहे. बऱ्याच व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करतात तर काही व्यक्ती वेगवेगळ्या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
तसं पाहायला गेले तर शेअर मार्केटमध्ये बऱ्याच योजना पाहायला मिळतात. परंतु त्यामध्ये SIP की, PPF नेमक्या कोणत्या योजनेमध्ये पैसे गुंतवायचे हेच अनेकांना समजत नाही. आज आपण दोन्हीही योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला किती फायदा होऊ शकणार आहे हे जाणून घेणार आहोत. या दोघांमध्ये SIP ही योजना मार्केटशी संबंधित योजना आहे तर, पीपीएफ योजना ही सरकारी योजना आहे.
पीपीएफ अकाउंट :
पीपीएफ ही योजना पंधरा वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडची असते. पीपीएफ योजना एक प्रकारची सरकारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेत जो व्यक्ती गुंतवणूक करतो तो मालामाल झाल्याशिवाय राहत नाही. पीपीएफ योजना तुम्हाला 7.1% परताव्याची हमी देते. दरम्यान या योजनेमध्ये तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवता म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही 12,500 रुपये गुंतवता. एकूण 15 वर्षांमध्ये ही रक्कम 22,50,000 रुपये होते. योजनेचा मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर तुम्हाला 40,68,209 रुपये मिळतात. म्हणजेच तुम्ही एकूण 25 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्ही नक्कीच करोडपती बनू शकता.
एसआयपी गुंतवणूक :
एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्याची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवणुकीशी कोणतीही लिमिट दिली जात नाही. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि आर्थिक अडचणींचा सामना करून सुद्धा छोटीशी रक्कम गुंतवू शकता. तुम्ही या योजनेत वर्षाला 1.5 लाखांची गुंतवणूक करत असाल तर, 15 वर्षांमध्ये तुमच्या खात्यात 28 लाख 50 हजार रुपये जमा होतील. एसआयपी 12% परतावा देते म्हणजे परताव्यानुसार तुमच्या खात्यात 1,09,41,568 रुपये जमा होतात. तुम्ही येताय तिच्या माध्यमातून देखील कोट्याधीश बनू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SIP Vs PPF Friday 20 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं