नागपूरमध्ये पोलिसालाच कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न.

नागपूर : नागपूरमध्ये चक्क डीवायएसपी दर्जाच्या पोलिसालाच कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच कायदा सूव्यवस्था कशी वेशीला टांगली गेली आहे त्याचं हे जिवंत उदाहरणं असल्याच बोललं जातय. कारण आज नागपूरचे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी विशाल ढुमे पाटलांना कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सामान्य नागरिक सोडा तर नागपूरमध्ये चक्क पोलिसच सुरक्षित नसल्याचं सिध्द झालं. मिळालेल्या माहीती नुसार त्या कारचा नंबर एमएच ३१ ईयू १५४२ असा आहे. सोमवारी कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जमिनीच्या वादातून दोन गटात दंगल उसळली होती, यावेळी दोन आरोपींना पकडताना त्यांनी त्या आरोपींनी गाडी थेट विशाल ढुमे पाटलांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्नं केला. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.
नागपूरमध्ये अनेक वर्षांपासून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट आहे. रोज दिवसाढवळ्या खून, बलात्कार, दोन गँगमध्ये भर रस्त्यात तलवारीनं मारामारी होणे हे नित्याचेच झाले आहेत. पण हद्द म्हणजे थेट पोलिसांनाच जीवे मारण्याचा प्रयत्नं भर दिवसा घडू लागले आहेत, त्यामुळे नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या शहरात आणि तेही भरदिवसा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं