'ते' दत्तक गाव मुख्यमंत्र्यांच, तर दुष्काळात मदतीची जवाबदारी स्वीकारली मनसेने

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील दत्तक घेतलेल्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी (खोडाला तालुका) येथील दुष्काळामुळे ओढवलेलं वास्तव लाव रे तो व्हिडिओ म्हणत जनतेसमोर मांडलं होतं. दरम्यान या गावातील महिला चक्क खोलवर विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत टाकत असल्याचं वास्तव अनेक वृत्त वाहिन्यांच्या विशेष वृत्तात समोर आलं होतं.
मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतःला महान दाखवण्यासाठी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपने केविलवाणा प्रयत्न केला खरा, मात्र सत्ताधारी म्हणून कोणतीही जवाबदारी त्यांनी स्वीकारली नाही. त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी कधी शिवाजी पार्क येथील झाड तरी दत्तक घेतलं होतं का, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता. मात्र जमिनीवर त्याच राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची जवाबदारी दुष्काळ काळात स्वीकारत आहेत.
२६ एप्रिलला नाशिकच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी खोडाला गाव जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले दाखवले आणि त्या गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी कशा वणवण फिरतायत आणि जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतानाचे व्हिडिओ दाखवले आणि मुख्यमंत्रीची फसवेगिरी जनतेसमोर मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे सरचिरणीस आणि कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना या गंभीर विषयात लक्ष देण्याचे आदेश दिले. त्यानंतर २००० लिटरच्या टाक्या आणि पाण्याचे टँकर्स १ मे २०१९ पासून ते पाऊस पडे पर्यंतची जवाबदारी त्यांनी स्वकारली आणि प्रत्यक्ष कामाला लागले. त्यानुसार सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्याकडुन गावात सर्व सामुग्री पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं