मोदींच्या सभेत सापांची भीती, कांद्याचा पाऊस नाही पडला म्हणजे मिळवलं

नाशिक: आज दिनांक २२ एप्रिल रोजी नरेंद्र मोदींची दिंडोरी नाशिक येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा आहे. मोदींची सभा ज्या मैदानावर होणार आहे ते मैदान ६०० एकरवर पसरलेले आहे. संपूर्ण मैदान जरी सभेसाठी वापरले जाणार नसले तरी मैदानाचा बराचसा भाग मात्र वापरला जाणार आहे. या मैदानाची पुरेपूर स्वच्छता करण्यात येईल अशी माहिती आहे.
या मैदानावर सापांचा वावर अधिक असल्यामुळे मोदींच्या या सभेची अधिक काळजी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस यांनी संयुक्त बैठक घेऊन या सभेसाठी योग्य ती आवश्यक सुरक्षेची काळजी घेण्याची चर्चा केली आहे. तसेच पुरेसा फौजफाटा आणि सर्पमित्रांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सभेत कोणीही काळ्या रंगाचे कपडे घालून येऊ नये याची देखील पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.
कांदा शेतकरी आक्रमक
बारा वर्षांपूर्वी याच लोकसभा मतदार संघामध्ये त्यावेळचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर शेतकऱ्यांनी कांदे फेकले होते. आणि आजची परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींवर देखील कांद्याचा पाऊस पडू शकतो. परंतु जर असा काही विरोध झालाच तर सगळ्या उपाययोजना सरकारने आधीच केल्या आहेत.
मोदी यांचे विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन होणार असून तेथून हेलिकॉप्टरने त्यांचे थेट पिंपळगाव येथे सभेच्या मैदानावर आगमन होणार आहे. वातावरण ढगाळ असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून आपत्कालीन स्थितीत रस्तेमार्गे ताफा नेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं