दत्तक नाशिक'मधील अतिहुशार सरकारी इंजिनियर आणि रस्त्यांची कामं: सविस्तर

नाशिक: आपल्या देशात पायाभूत सुविधा उभारताना कशाचा कशालाच ताळमेळ नसतो याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. एखादो रास्ता बनवताना त्याला करोडो रुपये खर्च येतो आणि तो साधारण ५-१० वर्ष तरी टिकावा ही साधारण अपेक्षा असते. काँक्रीटचा रस्ता बनवताना तर खूप काळजी घावी लागते. म्हणजे रास्ता बनवण्यापुरीच रस्त्याखालून जाणाऱ्या केबल्स आणि जलवाहिन्यांची तरतूद करणं गरजेचं असतं. तसे न केल्यास पुन्हा तयार झालेला रस्ता खोदून कामं पूर्ण करावी लागतात आणि त्यातून पुन्हा सरकारी कॉन्ट्रॅक्टर आर्थिक वाटमाऱ्यांचे रस्ते खुले करतात.
पूर्ण झालेल्या कामातून पुन्हा कामं शोधण्याची सवय सरकारी काँट्रॅक्टर्सला चांगली अवगत असतात. त्यामुळे रस्ते बनविण्याची कामं हातात घेण्यापूर्वी कोणताही इतर संबंधित काळजी घेतली जातं नाही. त्यामुळे सामान्य जनतेच्या पैशाची देखील नासाडी होते, तसेच रस्ते पूर्ण झाल्यावर ते पुन्हा इतर कामासाठी खोदण्यासाठी घेऊन ती नंतर त्याच अवस्थेत अर्धवट सोडली जातात. त्यात सरकारी इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं साटं-लोटं हे सर्वश्रुत असल्याने यावर कोणताही सरकारी आक्षेप देखील घेतला जात नाही.
तसेच प्रकार सध्या नाशिकमधील रस्त्यांच्या बाबतीत घडताना दिसत आहेत. कारण वर्षभरापासून सुरु असलेल्या स्मार्टरोडचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असताना आता जेवढा रस्ता तयार झाला होता तो देखील खोदून केबल टाकण्याचे काम सुरु झालं आहे. यावरून समाज माध्यमांवर स्मार्ट रोड ट्रोल होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान नाशिक शहरात स्मार्ट रॉड अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ असा एक किलोमीटरचा स्मार्ट रोड तयार करण्यात आला आहे. परंतु अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसून या रस्त्यावर नव्याने विजेचे खांब टाकण्यात आल्याने केबलचे सुविधाही नव्याने करण्यात येत आहे. परंतु आता स्मार्ट रॉड तयार झाल्यानंतर पुन्हा ठिकठिकाणी खोदकाम करून केबल टाकली जात आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले.
या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु असून ठिकठिकाणी उरलेले साहित्य, स्मार्ट रोडचा कचरा, अद्याप तसेच पडून असून यामुळे स्मार्ट रोडचा स्मार्टनेस अजूनही कागदावरच आहे का ? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. सोशल मीडियावर सध्या या केबल टाकण्या संदर्भातील फोटो व्हायरल होत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं