पोलीस कारवाईवरून जाणीवपूर्वक 'छत्रपती' शब्द प्रयोग करणाऱ्या फडणवीसांना नाशिक पोलीस आयुक्तांचं सुज्ञ प्रतिउत्तर

नाशिक, २५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा नोंद झाला आणि थेट अटकेचा आदेश निघाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला. यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय. माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. त्यांना माझं चॅलेंज नाही. माझंही थोडं ज्ञान आहे त्यानुसारच मी आदेश काढला, असं मत दीपककुमार यांनी व्यक्त केलं.
पोलीस कारवाईवरून जाणीवपूर्वक ‘छत्रपती’ शब्द प्रयोग करणाऱ्या फडणवीसांना नाशिक पोलीस आयुक्तांचं सुज्ञ प्रतिउत्तर – Nashik CP Deepak Kumar answer Devendra Fadnavis over criticism :
दीपक कुमार म्हणाले, “माजी मुख्यमंत्री साहेब ते खूप सुज्ञान आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, तर तो चुकीचा असेल, संविधानाच्या 236, 237 खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे. मात्र काल राणे साहेबांना जामीन मंजूर झाला, साहेबांनाी लिहून दिलं आहे अशी पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून अटक करण्याचा अर्थ नाही, त्यामुळे मंत्रिमहोदयांना नोटीस देऊन पूर्तता केली.
प्रोटोकॉलनुसार, मंत्रिमहोदयांशी आदरपूर्वक वागलं पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, ते पाळण्यात आलं. कोणतीही हयगय झालेली नाही. मंत्रिमहोदयांचा पूर्ण आदर सन्मान झाला, यापुढेही करु,” असंही दीपककुमार यांनी नमूद केलं.
नाशिक पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?
पोलीस आयुक्त दीपककुमार म्हणाले, “नारायण राणे यांना अटक करण्याची कॉम्पिटिशन नव्हती. दोन संवैधानिक व्यक्तींमध्ये वाद झाला होता. या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी अटकेचे आदेश दिले होते. साहेबांनी कोर्टात लिहून दिलं आहे, पुनरावृत्ती होणार नाही. त्यानंतर अटकेची कारवाई बदलली. आमच्या पथकाने योग्य कारवाई केली, त्यावर मी समाधानी आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Nashik CP Deepak Kumar answer Devendra Fadnavis over criticism news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं