नाशिक: पेट्रोल फेकून महिलेला ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नाशिक: निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
ज्या युवकासोबत अनैतिक संबंध होते, त्या युवकाचा साखरपुडा मोडण्यासाठी त्या महिलेने प्रयत्न केल्याने त्याचा राग मनात धरून त्या युवकाने आज पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळत आहे. पीडित महिला विधवा असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, ही महिला ४० टक्के भाजली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. पीडित महिला ही लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या गावात राहणारी आहे. या महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस फरार तरुणांचा शोध घेत आहे.
लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव नजीक येथील एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी अचानक चार संशयितांनी बसस्थानकात येत सदर महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने सदर महिला गंभीर भाजली असून तिला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे.
मात्र आता सदर महिलेस लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. दरम्यान, या महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते अशी प्राथमिक चर्चा आहे. या तरुणाचा साखरपुडा मोडण्यासाठी या महिलेने प्रयत्न केल्याचा राग मनात धरून या युवकाने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
Web Title: Story widow woman burnt by 4 youths at Lalslgaon in Nashik.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं