महत्वाच्या बातम्या
-
आधीच कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेमुळे सत्तापालट होण्याचे संकेत, त्यात भाजपच्या मंत्र्याचा उन्माद, महिलेला सर्वांसमोर कानशिलात मारली
BJP Karnataka | कर्नाटकात एका मंत्र्याने सार्वजनिक ठिकाणी महिलेला थप्पड मारल्याचं प्रकरण जोर धरत आहे. विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याचे पायाभूत सुविधा मंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. सोमन्नाने या महिलेला तिच्या संबंधित तक्रार करण्यासाठी आली असता महिलेला कानशिलात मारली होती.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Case | नवाब मलिक यांचे सर्व आरोप खरे होते | महाविकास आघाडीतील नेत्यांचा एनसीबीवर हल्लाबोल
सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी तील नेत्यांनी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान-कॉर्डेलिया ड्रग्ज केस प्रकरणावरून निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांद्वारे NCB वर टीका अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा एजन्सीच्या विशेष तपास पथकाला (SIT) आढळले की आर्यन खान (Aryan Khan Case) कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटमध्ये सामील नाही. क्रूझवर टाकलेल्या छाप्यांमध्येही एसआयटी विशेष पथकाला अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Lata Mangeshkar | भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन | देशावर शोककळा पसरली
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. मागील जवळपास महिनाभर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
3 वर्षांपूर्वी