महत्वाच्या बातम्या
-
मोदींनी लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिल्याचा संताप कॉलर उडवत केला होता: शिवसेना
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी, शहांचं गोड कौतुक करत उदयनराजे अखेर भाजपमध्ये
उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
6 वर्षांपूर्वी -
हा मोदी कोण लागून गेला; साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत: उदयनराजेंची क्लिप व्हायरल
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. ते आज दिल्लीला जाऊन लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. तर उद्यापासून पितृपक्ष सुरू होत असल्याने ते आजच भाजपात प्रवेश करणार असल्याचेही म्हटले जात आहे. पितृपक्षानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जात नाही अशी चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंगलदास बांदल आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील यांच्या विरुद्ध सेनेकडून लढण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
उदयनराजे भाजपात जाणार, त्यामुळे रामराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण येथील निवासस्थानी गुरुवार सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं, राष्ट्रवादीतच राहण्याची कार्यकर्त्यांची उदयनराजेंना विनंती
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामध्ये नवा ट्विस्ट निर्माणा झाला आहे. भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी आज पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजे यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही: हर्षवर्धन पाटील
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी सोडून नुकतेच भाजपवासी झालेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज हर्षवर्धन यांची भेट घेऊन बंद खोलीत त्यांच्याशी खलबतं केल्यानं या चर्चेला बळकटी मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
खासदार उदयनराजेंचं मन वळविण्यासाठी अमोल कोल्हे साताऱ्यात
खासदार उदयन राजे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसे सुतोवाच उदयनराजेंनी स्पष्टपणे दिलेले नसले तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयन राजे लवकरच प्रवेश करतील असे सांगितले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून खासदार अमोल कोल्हे यांनी आज उदयनराजेंची भेट घेत मन वळविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
सांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा
निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.
6 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त व रूग्णांच्या भेटी घेताना गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या अंथरुणावर शूज घालून
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून हसत सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी सांगलीत पाण्यात उतरुन पुन्हा मार्केटिंग केलं. मात्र बोलण्याच्या ओघात ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती अशी माहिती देताना अप्रत्यक्षपणे सरकार ४ दिवस झोपल्याचे सिद्ध केले होते. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच दिसले.
6 वर्षांपूर्वी -
संवेदनशील नाना पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार
सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शर्मिला राज ठाकरे आज सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: पुरग्रस्तांचे संसार, महत्वाची कागदपत्रं आणि मुलांची पुस्तकं सगळंच गेलं
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे ६ ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरकरांना दिलासा; मात्र सांगलीत अजूनही भीती कायम
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरमधील शोबाजीवरून नेटकऱ्यांनी झोडपताच महाजन सांगलीमध्ये पाण्यात उतरले
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर अखेर गिरीश महाजन यांनी पाण्यात उतरुन गेल्या ४ दिवसांपासून मदत न झालेल्या सांगली येथील पूरग्रस्त गावात पोहचले. विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली हे त्यांनी एकप्रकारे सिद्ध केलं आहे. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
सांगली: जयंत पाटील प्रत्यक्ष मदतीसाठी मैदानात; तर त्यांच्या पत्नी पुरग्रस्तांच्या जेवणाची काळजी घेत आहेत
सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
पुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; एनसीपीच्या प्रतिनिधींकडून ५० लाखांची मदत: शरद पवार
सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी