महत्वाच्या बातम्या
-
शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते जावईबुवा जगतापांच्या पाठिशी
नगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. काँगे्रसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील हे भाजपामधून उभे आहेत. मात्र त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.
6 वर्षांपूर्वी -
२३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला
पराभव समोर दिसत असल्यामुळेच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे आता चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे मात्र विसरू नका. कारण, येथे २३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, अशी व्यंगात्मक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
बोलायला मुद्दे नाहीत म्हणून जातीचे कार्ड खेळताय मोदी : अजित पवार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितले. यावर अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नरेंद्र मोदी जातीचे कार्ड खेळताय आशी टीका एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केली आहे. आयोजीत प्रचार सभेत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मत व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
हे काय? चक्क कट्टर हिंदुत्ववादी व एमआयएम एकाच खोलीत, स्क्रिप्ट देताना?
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण प्रचारात व्हिडिओ पुराव्यानिशी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल होत असल्याने भाजपचे नेते देखील राज ठाकरे यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष करत आहेत. त्यात राज ठाकरे हे बारामतीच्या काकांच्या सांगण्यावरून सर्वकाही करत आहेत आणि त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते असा खोचक टोला देखील लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांनी मनसेची चड्डी काढण्याची भाषा केली; राज ठाकरेंनी भाजपचीच चड्डी भर सभेत काढली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल काल सोलापूरच्या जाहीर सभेत केली. या संदर्भातला व्हिडिओ काल राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जनतेसमोर सादर केला. दरम्यान, सरकारच्या या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणच राज ठाकरेंनी मनसेच्या मंचावर आणला. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका मुलाखतीतील हरिसाल आणि राज ठाकरे यांच्याबद्दलची क्लिप लोकांना ऐकवली होती. संबंधित तरूणाला भारतीय जनता पक्षातील कार्येकर्ते शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये.
6 वर्षांपूर्वी -
दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा
लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत करायची आहे. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा धक्कादायक सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते : शरद पवार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, एनसीपीच्या आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे. आपण अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर २-३ दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
6 वर्षांपूर्वी -
ते म्हणाले 'आता बॉम्बस्फोट होत नाहीत'; मोदींना पुलवामात काय झालं ते अजून माहित नाही?
आता बाँबस्फोट होत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत आहे चौकीदार त्यांना कोठुनही शोधून काढील आणि शिक्षा करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये केले. काँग्रेस – एनसीपीच्या काळात दहशतवाद वाढला होता. देशात दररोज कुठे ना कुठे बाँबस्फोट होत होते. त्यात सामान्य लोकांचे बळी पडत होते.
6 वर्षांपूर्वी -
जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा: शरद पवार
लोकसभा निवडणुकीत जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी मतदान करा, असं म्हणत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं जाहीर आवाहन मतदाराला केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला हणाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या चुकीसाठी पार्थला फासावर लटकवणार का? अजित पवार
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, एनसीपीचे नेते अजित पवार यांनी एनसीपीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यातून मोहन जोशींना काॅंग्रेसकडून उमेदवारी
अखेर पुण्यातून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स संपवत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी नुकतेच पक्षात दाखल झालेले प्रवीण गायकवाड इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे आढळराव पाटील मदतीसाठी मनसेच्या कार्यालयात? वसंत मोरे म्हणतात 'शेवटी आदेश राजसाहेबांचा
शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये विळा-भोपळ्याचे नाते असले तरी उमेदवार मदतीची चाचपणी करण्याचे सर्व प्रकार अजमावून बघतात आणि तसाच काहीसा प्रकार शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा क्षेत्रात घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा क्षेत्रात चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. त्याचाच प्रत्यय याभेटीनंतर आला आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांकडून भिडेंच्या धारक-याला उमेदवारी, गोपीचंद पडळकरांचे फोटो उघड
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, आता पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सार्वजनिक झाल्याने प्रकाश आंबेडकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. एवढेच नाही तर, पडळकर यांनी भिडे यांना तब्बल अकरा लाख रुपयांची मदत केल्याचा संदेश सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामुळे पडळकर अडचणीत येण्याची शक्यता दाट शक्यता निर्माण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलेल्या धैर्यशील माने यांना सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नातू म्हणाला आजोबा मीच 'पार्थ' मीच लढणार, आजोबांना ताईंची काळजी, दादांना पोराची
मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके, आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, अशा शब्दात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दानवेंकडून सीआरपीएफ'च्या ४० शहिदांचा थेट 'अतिरेकी' म्हणून उल्लेख
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अजून एका वादात सापडले आहेत. याआधी शेतकऱ्यांचा ‘साले’ असा अपमानजनक उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी आता कहर केला आहे. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी शहीद जवानांऐवजी त्यांचा थेट ‘अतिरेकी’ असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर कडाडून टीका केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस साहेब! आमच्या चड्ड्यांची काळजी सोडा, तुमच्या चड्ड्यांचा वापर मतदाराने सुरु केला आहे
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोल्हापूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांनी सुद्धा फडणवीसांच्या बोचऱ्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरचा सभेला थेट कर्नाटकातून माणसं आणली, मराठी समजत वा बोलताही येत नव्हतं
भाजपा आणि शिवसेनेची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात झाली. तेव्हा संपूर्ण मैदान भरून रस्त्यापर्यंत गर्दीचा रेकॉर्ड झाला. या तुफान सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या तीन मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे आणि महादेव जानकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा अनेक लोकांशी व्यक्तिशः बोलून पाहिलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर बसलेल्या महिलांना ना मराठी येत होतं, ना मराठी समजत होतं हे त्यांनी कॅमेरावर मान्य केलं. त्यावरूनच हे लोंढे जवळच्या सीमेवरून म्हणजे कर्नाटकातून आणल्याचं प्रसार माध्यमांच्या ध्यानात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमानावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी जनसागर दाखवण्यासाठी किती पैसा खर्ची केला आहे याचा प्रत्यय येत होता.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाची दुसरी यादी; पुण्यातून बापट तर बारामतीतून कुल यांना उमेदवारी
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. काल रात्री उशिरा भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कुल या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता एनसीपीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल.
6 वर्षांपूर्वी