महत्वाच्या बातम्या
-
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी, मतदाराच्या या वृत्तीमुळेच राजकारणी उन्मत्त होतात?
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमवर सर्वबाजूने टीका झाली होती. परंतु, असं असताना अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम तडीपार असताना सुद्धा वॉर्ड क्रमांक ९ मधून तब्बल २००० पेक्षा अधिक मताधिक्याने आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेवून बांधा : मंत्री राम शिंदे
जर तुमच्याकडे जनावरांसाठी चारा नसेल तर तुमची जनावरे पाहुण्यांकडे जाऊन बांधा, असा विचित्र सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्थानिक शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राम शिंदेंचा तो व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर खूप व्हायरल होताना दिसत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी उमटली आहे.
6 वर्षांपूर्वी -
घोषणाबाज युती सरकारला शिर्डी संस्थानकडून बिनव्याजी कर्ज घेण्याची वेळ
नुकत्याच आलेल्या या बातमीने सरकार किती आर्थिक संकटात आहे याची चुणूक लागली आहे. कारण आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून तब्बल ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतलं आहे. दरम्यान, हा निधी राज्य सरकार तर्फे अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
विधानसभा उपाध्यक्ष: डिसेंबरमध्ये सत्ता सोडणार होते, पण नोव्हेंबरमध्ये अजून एका पदावर दावा
दसरा-दिवाळी असे महत्वाचे सण संपताच म्हणजे डिसेंबरमध्ये शिवसेना सत्ता सोडणार असे खासदार विनायक राऊत काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आणि भाजप सोबत युती नाही म्हणजे नाही, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने डिसेंबर सुरु होण्याच्या एक दिवस आधी विधानसभेच्या उपाध्यक्ष जागेसाठी अर्ज दाखल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: १ डिसेंबर फार दूर नाही, किती जल्लोष होतो ते पाहूच; मुख्यमंत्र्यांना टोला
१ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची घोषणा म्हणजे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचे पवार म्हणाले. मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये फूट पाडून निवडणुका जिंकण्याचे फडणवीसांचे दिवास्वप्न असल्याची बोचरी टीका एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदे दरम्यान केली. आता १ डिसेंबर ही तारीख तर खूप नाही; त्यामुळे किती त्यांच्या घोषणेप्रमाणे किती जल्लोष होतो हे सुद्धा पाहूच, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भतील विधानावरून लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नगर निवडणूक: भाजप खासदारांचे कुटुंबीय व सेना विद्यमान विरोधी पक्ष नेत्याचा अर्ज बाद
स्थानिक महापालिका निवडणुकीसाठी आयत्यावेळी केडगावचे काँग्रेसचे तब्बल ५ उमेदवारांना भाजपात प्रवेश देऊन निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीआधीच मोठी चपराक मिळाली आहे. करण भाजपचे तब्बल ४ महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे यात स्वतः भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी तसेच त्यांच्या स्नुषा दीप्ती सुवेद्र गांधी यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
मातीत राबणारा बळीराजा मुंबईत, तर सत्ताधीश हेलिकॉप्टरने मातीचा कलश घेण्यासाठी शिवनेरीवर
राज्यातील दुष्काळ तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील बळीराजा आणि आदिवासींनी भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. भव्य लोकसंघर्ष मोर्चा मुंबईतील सोमय्या मैदानातून आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. प्रलंबित वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि संपूर्ण कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा आणि आदिवासींनी हा भव्य मोर्चा काढला आहे. दरम्यान, झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी ठाणे, पालघर पासून ते थेट भुसावळ जिल्ह्यातील बळीराजा आणि आदिवासी समाज एकवटला आहे.
7 वर्षांपूर्वी -
युनिसेफकडून सुप्रिया सुळेंचा पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव
राष्ट्रवादीच्या खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा युनिसेफ या जागतिक संघटनेने ‘पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेन’ने गौरव केला आहे. अनेक अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रिया सुळे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल युनिसेफने घेतली आहे. त्याच्या या कार्याची दखल खुद्द संयुक्त राष्ट्र संघाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
आरक्षण ते दुष्काळ; सर्व काही परमेश्वरा भरोसे मग सरकार नक्की काय करत? सविस्तर
सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे आणि त्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्याने सरकार तसेच विरोधक सर्व महत्वाच्या मुद्यांवर समोरासमोर उभे ठाकणार हे नक्की आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातून (SEBC) स्वतंत्र आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केली.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुका आल्यावर भाजप - शिवसेनेला राम आठवतो
निवडणुका जवळ आल्या की भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींना लगेच राम आठवतो, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा युतीबाबत कोणताही निर्णय झाला तरी काँग्रेस आणि एनसीपी’ची आघाडी होणारच आहे, असे सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठवाड्यासाठी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आज अखेर मराठवाड्यासाठी विविध धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातून सकाळी ८.४० च्या सुमारास जायकवाडी धरणासाठी ४२५० क्युसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तर मुळा धरणातून ६,००० क्युसेक्सक इतके पाणी सोडण्यात आले असे प्रश्नाने कळवले आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवारांची अमित शहांवर टीका, न्यायालयाचे निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नाहीत
पुण्यात एनसीपीच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पार पडली. दरम्यान, या कार्यक्रला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सुद्धा भाषणादरम्यान समाचार घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, उद्धवला सांभाळा! त्याचा अर्थ काल समजला: रोहित पवार
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची अजून एक नवी समोर येत आहे. होय! एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार आता सामनातील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काकाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राजकारणातील टाकाऊ माल आहेत, अशी हलक्या भाषेतील टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रतिउत्तर दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळले या प्रश्नामुळे उद्धव यांना मिरची झोंबली: अजित पवार
सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भविष्यात सुद्धा ब्राह्मण समाज देशाचे नेतृत्व करत राहील
सध्या आपल्या समाजात असमानता निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, देशात ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे ध्यानात येत नाही की यापूर्वी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या देशाचे नेतृत्व केले होते आणि त्याप्रमाणेच भविष्यात सुद्धा करतच राहील, असे सांगत पुण्याच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वतःच्याच सरकारला जुमलेबाज बोलणारा शिवसेना पक्ष हाच मोठा "जुमला" आहे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीतील भाषणानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस असून त्यांना या वर्षीचा “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अवॉर्ड” देण्यात यावा अशी बोचरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही, पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिरावरून बोचरी टीका केली आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असताना अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा अापल्या जन्मदात्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर जनतेला त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना राम मंदिराच्या नावाने भावनिक आवाहन करून राजकरण करण्याचा खेळ सुरु आहे असं अजित पवार म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुखांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे खुलं अाव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo: स्त्रिया अत्याचार होतो तेव्हाच आवाज का उठवत नाहीत? सिंधुताईंचा रोखठोक सवाल
‘मी-टू’ मोहिमेंतर्गत मागील काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक कलाकार, राजकारणी आणि पत्रकारांची सुद्धा नाव पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान १०-१५ वर्षांनी बाहेर येणारी ही प्रकरणं बघून अनेकांनी संशय सुद्धा व्यक्त केला होता. परंतु काही दिवसामध्ये या मोहिमेचा अतिरेक होत आहे असे वाटू लागल्याने ही मोहीम जास्त दिवस टिकणार असे एकूणच वातावरण झाले आहे. आता सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे सिंधुताईंनी सुद्धा या विषयावर मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
खोटे बोलण्यात ते पटाईत; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. माझ्या रक्तातच लाचारी नाही आणि मी सत्तालोलूप सुद्धा नाही, पण तुम्ही तर चक्क खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा औढा देशद्रोहच आहे, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर प्रहार केले.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी घेतलं शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन
पंतप्रधान मोदींनी अहमदनगरच्या विमानतळावर काही वेळापूर्वी आगमन झालं. काही वेळेपूर्वीच ते साई समाधी शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले आणि पूजन सुद्धा करण्यात आलं. याशिवाय आज त्यांच्या भेटीदरम्यान विविध कामांचं भूमीपूजनदेखील करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी