महत्वाच्या बातम्या
-
वाद पेटणार? | पूरग्रस्तांना सर्व मदत केंद्र सरकारनेच केली - राज्यपालांच वक्तव्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत त्यांनी थेट राजकीय पवित्रा घेतला आणि केंद्रानेच ही मदत दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे नावही घेतले नाही. त्यांच्या या भूमिकेने राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दरी अधिकच रुंदावत असल्याची प्रचिती पुन्हा आली.
4 वर्षांपूर्वी -
ED, CBI मार्फत दिलेला त्रास भाजपला भोगावा लागेल | मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यातील अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पार्टीने उद्योग सुरू केला. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण भारतीय जनता पार्टीत गेले. परंतु, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्याला अपवाद ठरले. आरोप करणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र, भारतीय जनता पार्टीने दिलेला त्रास हा भाजपाला सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. न्यायालयाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया कोल्हापुरात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सातारा भाजप | शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये सशस्त्र मारामारी | अनेकजण गंभीर जखमी
साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली. बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा चाकू, तलवार अशी हत्यारे घेऊन कार्यकर्त्यांच्या घरात घुसून हल्ला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर खोत याने आपल्या साथीदारांसह तांबवे येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास घडला.
4 वर्षांपूर्वी -
बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षातून अनोखी सफर
पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजित पावर यांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोलापुरातील काँग्रेस भवनावर हल्ला | दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार
सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक आणि शाई फेकून नव्या राजकिय वादाला सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धावून आले.
4 वर्षांपूर्वी -
जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? - अण्णा हजारे
देशातील राजकारणात काही वाद किंवा चर्चा सुरू झाल्यावर सर्वांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण येत असते. अशा वेळी आता अण्णा हजारे कुठे गेले असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. तसेच आता अण्णा हजारे हे झोपले आहेत का? अशी विचारणाही केली जाते. आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. ‘जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
150 कोटी थकवले | भाजप आ. राहुल कुल यांच्या साखर कारखान्याला जप्तीची नोटीस
पुणे जिल्ह्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे बँकेने ही नोटीस बजावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत कर्मचारी ज्योती देवरेंविरोधात संपावर | चित्र वाघ यांचा देवरेंना 'राजकीय' पाठिंबा?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कालच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. चित्र वाघ त्यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी याविषयात त्यांना अनेक आरोप असतानाही समर्थन देत असल्याचं कर्मचारी देखील ऑफ कॅमेरा सांगत आहेत. मागील काही दिवसांपासून त्या स्वतःची चौकशी होणार असल्याने भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवून स्वतःचा बचाव करत असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
साताऱ्यात भाजप खासदार विरुद्ध भाजप आमदार | 'ते' थापांचा पाऊस पाडण्यात माहीर | उदयनराजेंवर जोरदार टीका
मागील साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय | अजित पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नसल्याचा ठपका यशोमती ठाकूर यांनी यावेळी ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहेत. अजित पवार सहकार्य करत नाही असे जरी बालविकास मत्र्यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तक्रार अर्ज महिलेचा नाही, महिलेच्या नावाचा वापर, स्वाक्षरी सुद्धा खोटी | षडयंत्र रचलं कोणी?
संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
ऑडिओ क्लिप व्हायरल पूर्वी 6 ऑगस्टला विभागीय आयुक्तांना कसुरी अहवाल | सरकारी कामात अनियमितता ठपका, कारवाईची शिफारस झाल्याने...
पारनेरच्या लोकप्रतिनिधीवर धक्कादायक आरोप करत आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्टलाच विभागीय आयुक्तांना एक कसुरी अहवाल पाठवल्याचे उघड झाले आहे. देवरे यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
तहसीलदार ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप | विभागीय आयुक्तांचा अहवाल | २०२० पासून होत्या वादात... म्हणून बनाव?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.
4 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये ऑडीओ क्लिप बॉम्ब | तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा | तो लोकप्रतिनिधी?
लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले”, असं हृदयाला बोचणारे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर-गुजरातमधून राज ठाकरेंना पुढे केले जातंय - संभाजी ब्रिगेड
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? | संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याचा धक्कादायक सवाल
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतील - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवादी राजकारण वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, काही लोक काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करीत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मंत्री दत्तात्रय भरणे भर कार्यक्रमातील संवादात म्हणाले, 'मुख्यमंत्री मरु द्या' | शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटणार
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे कार्यक्रम होते. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे 43 एकर जागेवर वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे बोलताना मुखमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे सोलापुरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांनी ताबडतोब दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर घसरलेली जीभ बाहेर काढू अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परवानगी मिळण्यासाठी गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, अशी साद घालत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे बंदी झुगारून शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी