महत्वाच्या बातम्या
-
आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत: फडणवीस
मुंबईमध्ये आज मराठा समाजाच्या काही समन्वयकांशी मुख्यमंत्र्यांशी बैठक पार पडली. त्यावेळी चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ज्या आंदोलकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद झाले ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणसाठी आज पुण्यात चक्काजाम
मराठा आरक्षणावरून राज्यभर हिंसाचार सुरु झाल्यावर राज्य सरकार खडबडून जाग झालं असलं तरी मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलन आणि चक्काजाम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज मराठा आरक्षणसाठी पुण्यात चक्काजाम करण्यात आल्याने अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता.
7 वर्षांपूर्वी -
मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचं राज ठाकरेंच्या अजान'च्या वक्तव्यावर परखड मत, वक्तव्याचा विपर्यास!
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात पदाधिकारी मेळाव्या आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना जैन, राम मंदिर तसेच मुस्लिम समजासंबंधित रोखठोक मत व्यक्त केलं आहे. परंतु त्यात त्यांनी अजान’च्या संबंधित वक्तव्य केलं, तेच केवळ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केलं गेलं आणि मूळ विषयाला बगल देऊन राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं परखड मत मनसेचे इरफान शेख यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी 'वारीत साप' सोडण्याचं विधान केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले
राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच वारीत साप सोडण्याचं विधान केलं आणि त्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. नाहीतर मराठा आरक्षणच आंदोलन शांततेत चाललेलं, पण सत्ताधाऱ्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि आंदोलन चिघळलं,’ अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पोटात आमच्या पाप नाही अन महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही: शरद सोनवणे
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे सुद्धा मंचावर उपस्थित होते. अनेक दिवसानंतर ते आज मनसेच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित सुद्धा केलं. त्यांच्या रोखठोक भाषणातून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा जागविण्याचे काम केले.
7 वर्षांपूर्वी -
आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील: राज ठाकरे
सध्या मराठा आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असताना सर्वच पक्षांकडून बचावात्मक प्रतिक्रिया येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोख ठोक भूमिका घेतली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त ते पुण्यात आले असता त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मूळ आरक्षणाचा विषय सरकारच्या हातात राहिलेला नाही, शिवसेना आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यात आता शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा राज्यातील स्थितीवर आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
हिंसा नको, सरकार चर्चेला तयार: मुख्यमंत्री फडणवीस
मराठा समाजाने हिंसा वा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही
सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
परभणीत मराठा आंदोलन चिघळलं, ६ बसेस आणि पोलीस व्हॅन सुद्धा जाळल्या
मागील २ वर्षापूर्वी शांततेत पार पडलेले मराठा समाजाचे मोर्चे आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये ४ खासगी गाड्या, ५ बसेस आणि पोलिसांची व्हॅन जाळली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे
समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेणगावच्या जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
शेणगावच्या अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपुरात सकाळी साडेतीनच्या सुमारास ही विठूरायाची ही शासकीय पूजा पार पडली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय
मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरवर्षी पंढरपुरात आषाढीची पूजा पार पडत असते आणि कायम चालत आलेली शासकीय प्रथा आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री व आमदार सध्या संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाही: अजित पवार
मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं असता उपस्थितांना संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावेळी रंगलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूरमध्ये संतप्त मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाम, एसटी बसेस सुद्धा फोडल्या
मराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर दूध आंदोलन मागे घेत आहोत: राजू शेट्टी
मागील चार दिवसांपासून सुरु असलेले दूध आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय राजू शेट्टी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राजू शेट्टी ही अधिकृत घोषणा केली आणि अखेर सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
NEET वैद्यकीय शिक्षणात प्रथम राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायला हवं: राज ठाकरे
मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा संबंधित गंभीर विषयाला हात घातला. काही दिवसांपूर्वी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पालक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.
7 वर्षांपूर्वी -
उद्या भाजप सरकार गेल्यावर, त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्ट्याने मारावे का? राज ठाकरे
मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून त्यामुळे अनेक प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यां आक्रमक पवित्रा घेत झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन छेडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटने पुण्यात दुधाच्या ५ गाड्या फोडल्या, मुंबईत ‘दूध-कोंडी’
राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी