महत्वाच्या बातम्या
-
Bank Job Alert | लोकमंगल को-ऑप बँकेत 40 जागांसाठी भरती | ईमेल द्वारे अर्ज करा
लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती 2021. लोकमंगल सहकारी बँक लि.सोलापूरने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि 40 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी LCO बँक भारतीला ईमेल द्वारे अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
स्थानिक राजकारणाच्या नावाखाली भाजप आमदारांच्या मनसे शाखेत भेटी वाढल्या | सापळा घट्ट होतोय? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. एकाबाजूला युती होणार नसल्याचे संकेत दिल्लीतून आले असताना भाजप आमदार मनसेच्या शाखांमध्ये एकामागून एक हजेरी लावू लागले आहेत. मात्र मनसे पदाधिकारी याला केवळ फोटो काढण्यापुरतीचं राजकारण समजत आहेत असं प्रथम दर्शनी दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी नेते राम शिंदेंना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी पुढे | फडणवीस काय करणार?
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत आता अहमदनगर जिल्ह्यातयून आणखी एक नाव पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील भाजप नेते राम शिंदे यांचे नाव त्यांच्या समर्थकांमधून पुढे करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते, मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव, पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांनाच हे पद मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी गेल्या निवडणुकीत शिंदे यांचा पराभव केला.
4 वर्षांपूर्वी -
नगर-पारनेर | आ. निलेश लंके आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष भेटीनंतर राजकीय चर्चा सुरु | लंके काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आ.निलेश लंके यांची मी पारनेर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेलो असता माझ्या सहकाऱ्यां समवेत सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून सदिच्छा भेट होती. या भेटीबाबत अनेक राजकीय स्वरूपाची चर्चा समाज माध्यमांमधून आणि इतर व्यासपीठांवरून सुरू आहे. या भेटीचा विपर्यास यातून झाल्याचे दिसते. आ. लंके यांना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या एवढेच या भेटीत घडले असा खुलासा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राम शिंदे समर्थक ढोकरीकर आ. रोहित पवारांच्या गटात | नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी धक्का
भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंत्री असतानाही राम शिंदेंना जमलं नाही ते आ. रोहित पवारांनी केलं | कर्जत-जामखेड बस स्थानक, व्यापारी संकुलाचे भूमीपूजन
कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारले जात आहे. त्याचसोबत नागरिकांच्या सोईसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत. मंगळवारी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी चारित्र्यहननाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा | मुख्यमंत्र्यांविरोधात बातम्या झळकण्यासाठी लोकांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ?
सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर दौरा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
सांगली दौरा | कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार, मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री
सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर दौरा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | 2019 मध्ये मंदिरात आश्वासन देणारे फडणवीस आता त्याच मंदिरात २०२१ मध्ये प्रकटले | नागरिकांनी झापले
2019 मध्ये ज्या दोन गावांना महाप्रलयाचा फटका बसला. त्याच आंबेवाडी आणि चिखली गावाला यावर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला आहे. 2019 मध्येही अनेक मंत्री, नेते गावात येऊन नागरिकांना आश्वासन देऊन गेले. अनेकांना मदत मिळाली तर काहींना मिळाली नाही. त्यामुळे यावेळी गावात महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांच्या शब्दांचा मार सोसावा लागला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी हिताची ठिबक सिंचन अनुदान योजना 2021-22 | कसा लाभ घ्याल - वाचा माहिती
सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पारनेर तालुकाध्यक्षाच्या पत्नीला खंडणी प्रकरणी अटक
एकाबाजूला पक्षातील वरिष्ठ आगामी महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मनसेच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेच्या महा बजेटमधील पैसा जातोय कुठे? | माहिती घेऊन भाजपाची पोलखोल करा - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन ते संपूर्ण पक्षकार्याचा आढावा घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सांगलीतील पुरस्थितीनंतर | नदी पात्रातील मगर रस्ते आणि घराच्या छतावर
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महापूरमुळे अनेक लोकांचा संसार उघड्यावर आले असून यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, दुसरीकडे सांगलीतून एक खूपच भीतीदायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील एक मजली घर पाण्यात बुडाले होते.
4 वर्षांपूर्वी -
अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय बैठकीत भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांची हकालपट्टी
नेवासे तालुक्यातील शिवसेनेचे झापवाडी येथील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच पक्षविरोधी कामे केल्याने नेवासे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हाकालपट्टी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापुरातील वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड | परिसरातील गावांना धोका
मागील आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस आणि शुक्रवारी झालेली अतिवृष्टी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासणोली धरणासह तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पदाचा मान बाजूला ठेवत उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्याच्या चहा स्टॉलचं उद्घाटन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांची दुसरी बाजू बारामतीकरांना पाहायला मिळतात. अजितदादांचं असंच एक दिलखुलास रुप आज बारामतीत पहायला मिळाले. माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला.
4 वर्षांपूर्वी -
साताऱ्यातही अतिवृष्टीचा फटका | आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू, 15 घरं या दरडीखाली
मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमधील तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली आहे. त्यावेळी अनेक लोकांना वाचवण्यातही आले. आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 30 ते 32 लोक मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Ashadhi Ekadashi 2021 | मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली आषाढी यात्रा पंढरपुराने पाहिली आहे. तीच वारी आम्हाला परत पाहायला मिळाली पाहिजे. ‘हे विठ्ठला कोरोनाची संकट लवकरात लवकर दूर कर आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे आषाढी वारी, वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली पंढरी पाहू दे’ असे साकडे पांडुरंग चरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. या बाबत वारकर्यांनी सर्वोच्च न्यायालयात पायी वारीसाठी परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हि याचिका फेटाळली आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोना असल्याने वारीला संमती देण्यात आलेली नाही. वारीला संमती मिळावी म्हणून वारकऱ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
4 वर्षांपूर्वी