महत्वाच्या बातम्या
-
शिंदे है तो मुमकिन है? शिंदे राजवटीत कर्नाटक भाजपचा आत्मविश्वास वाढला, सांगलीतील 40 गावं कर्नाटकात घेण्याचा हालचाली
Sangli 40 Villages in Jat Taluka | सांगलीच्या जत तालुक्यातील ४० दुष्काळग्रस्त गावांनी नुकताच कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने ही गावे आपल्या राज्यात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे दिसत आहे. यासंदर्भात कर्नाटकच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले की, जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. आता या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Target BJP | ईडी वगैरे काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांना नेमका का त्रास दिला जातोय याचं नेमकं कारण (Sharad Pawar Target BJP) सांगितलं आहे. “महाराष्ट्र सरकारमधील अनेकांना प्रचंड त्रास दिला. मात्र काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल महागले तर काय झाले, सुविधा मिळाल्या | लस मोफत मिळत आहे - सुजय विखे पाटील
देशात एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन सामान्य जनेतला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तर दुसरीकडे या दरवाढीचा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. पेट्रोल डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी यांनी लस मोफत दिली त्याचादेखील फलक झळकवा. असा अजब युक्तीवाद भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी