श्रद्धा वालकर प्रकरणी तपासात कोणताही राजकीय दबाव आढळला नाही, फडणवीसांच्या उत्तराने भाजप आमदार तोंडघशी

Shraddha Walker Case | हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असतानाच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची लक्षवेधी मांडून या प्रकरणाकडे आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण श्रद्धा वालकरची नोव्हेंबर महिन्यात झालेली हत्या आणि त्यानंतर ते प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहेत.
ज्या श्रद्धा वालकरची दिल्लीत तिच्या प्रियकराने तुकडे तुकडे करून हत्या केली. त्या प्रकरणाची खरं तर सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. आशिष शेलार यांनी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळी श्रद्धा वालकरची हत्या झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे तेव्हापासून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीस यांनी दिलं उत्तर :
दरम्यान, शेलार आणि भातखळकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, श्रद्धा वालकर हे प्रकरण मानवतेला काळिमा फासणारं आहे. माझी आणि तिच्या वडीलांची भेट झाली. मी सगळा घटनाक्रम समजून घेतला. ही केस दिल्लीमध्ये घडली असल्याने दिल्ली पोलीस तपास करत आहेत. अद्याप पर्यंतच्या तपासामध्ये कोणत्याही राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. तथापि तिने तक्रार परत का घेतली याची चौकशी आपण करत आहोत.
ती तक्रार तिने साध्या मनाने मागे घेतलेली नाही हे निश्चित. त्याचप्रमाणे तिने तक्रार करणं आणि तक्रार मागे घेणं यात एका महिन्याचं अंतर आहे. या दरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? थोडी त्याची दखल घेतली असती तर अशा प्रकारची घटना टाळता आली असती. असं म्हणून फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घटना पुढील काळात घडू नये यासाठी आपण डीजींच्या मार्फत सर्व पोलिसांना निर्देश दिले असल्याचं सांगितलं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shraddha Walker case DCM Devendra Fadnavis denied allegations BJP MLAa check details on 20 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं