मराठा आरक्षण: १ डिसेंबर फार दूर नाही, किती जल्लोष होतो ते पाहूच; मुख्यमंत्र्यांना टोला

कोल्हापूर : १ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची घोषणा म्हणजे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचे पवार म्हणाले. मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये फूट पाडून निवडणुका जिंकण्याचे फडणवीसांचे दिवास्वप्न असल्याची बोचरी टीका एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदे दरम्यान केली. आता १ डिसेंबर ही तारीख तर खूप नाही; त्यामुळे किती त्यांच्या घोषणेप्रमाणे किती जल्लोष होतो हे सुद्धा पाहूच, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भतील विधानावरून लगावला आहे.
नातेवाईकांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शरद पवार कुंटुंबीया २ दिवसांपासून कोल्हापुरात आहेत. त्यावेळी पवारांनी प्रसार माध्यमांशी मुक्त संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्नोत्तराच्या वेळी पवार म्हणाले की, “मराठा आरक्षणासंबंधी फडणवीस स्वच्छपणे काही सुद्धा माहिती देत नाहीत. तसेच कुणाचे तरी असलेले आरक्षण काढून घेऊन ते आरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी किंवा अन्य घटक यांच्यात तेढ निर्माण करण्याची फडणवीसांची नीती दिसते आहे. भविष्यात राज्याच्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक आहे. त्यामुळे या नीतीचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या एकतेवर होईल असं पवार म्हणाले.
युती सरकारची ही पावले सामाजिक अभिसरण आणि मन उद्ध्वस्त करणारी ठरू शकतात. त्यांनी १ डिसेंबरला जल्लोष करण्याची केलेली घोषणा त्याच
हेतूने प्रेरित आहे असं ते म्हणाले. दरम्यान, सर्वच समाजांतील गरीब घटकांना सध्या आरक्षण देण्याची गरज आहे असं मत त्यांनी यावेळी मांडलं तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी होण्यात काहीही अडचण नाही. आतापर्यंत एकूण जागांपैकी लोकसभेच्या ४१ जागांचे वाटप सुद्धा पूर्ण झाले आहे. उर्वरित राहिलेल्या ६-७ जागांबाबत अद्याप बैठक सुरु असून त्यामध्ये दोन्ही बाजूंनी काही आक्षेप आहेत. मात्र ते सुद्धा आम्ही एकत्र बैठकीत सामंजस्याने मार्गी लावू असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं