एकनाथ शिंदेंना नेतेपद नाहीच, तर आदित्य ठाकरेची नेतेपदी वर्णी.

मुंबई : आज मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंची नेतेपदी नियुक्ती झाल्याचे घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची संधी यंदाही हुकली आहे. शिवसेनेतील एका गटाने तीव्र विरोध केल्याने त्यांना अखेर नेतेपद मिळू शकलेलं नाही. तर दुसरीकडे मनोहर जोशी आणि सुधीर जोशींची यांची नेतेपद कायम ठेवण्यात अली आहेत.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबेनी केलं अभिनंदन;
आज शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या ‘राष्ट्रीय’ अधिवेशनात आदित्य ठाकरेंना बढती देऊन त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढवणार असल्याचे कळते. सतत नविन काहीतरी करण्याची धडपड करणारे आदित्यंना माझ्या शुभेच्छा! आपण सर्व मिळून सर्वसामान्य युवकाचा आवाज होऊ !! @AUThackeray
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) January 23, 2018
शिवबंधन ते वाघाची अंगठी;
शिवबंधनानंतर आता शिवसैनिकांसाठी पक्षाची ओळख असलेली ‘वाघाची’ अंगठी तयार करण्यात आली आहे. स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने एकूण ८८ शिवसैनिकांना या नवीन अंगठीचं वाटप करण्यात आलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं