फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील कलाकार आहेत | मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार का? - प्रिया बेर्डे

मुंबई, १४ सप्टेंबर | लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून संतप्तजनक प्रतिक्रिया येत असताना नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनीही भाजपवर टीका केली आहे. “भाजपमध्येही अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीस, मग या सर्व महिलांबद्दलही तुम्ही असचं बोलणार आहात का?” असा संतापजनक सवाल प्रिया बेर्डे यांनी केला आहे.
फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील कलाकार आहेत, मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार का? – Actress Priya Berde criticized BJP leader Pravin Darekar over statement against Lok Kalakar :
मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार आहात का?
पक्षाचे नाव घेऊन ते जर रंगलेल्या गालांचे मुके घेणारे राष्ट्रवादी हा पक्ष आहे. तर मग आणखी काय समजायचं? इतर कोणताही पक्ष असू दे, भाजपमध्येही कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील दिग्गज कलाकार आहेत. मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार आहात का?” असा प्रश्न प्रिया बेर्डे यांनी उपस्थित केला आहे.
दुसऱ्याला नावं ठेवण कितपत योग्य आहे:
कुठल्याही महिलेबद्दल किंवा कलाकाराबद्दल हे बोलणं चुकीचं आहे. निंदनीय आहे. कधीही टीका करताना या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचे असतं. प्रत्येकवेळी आपण किती चांगले आहोत, हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला नावं ठेवण कितपत योग्य आहे. यासाठी तुम्ही कोणती पातळी गाठता, याचे आता काहीही तारतम्य उरलेले नाही. राष्ट्रवादीत अनेक लोककलावंत, कलाकार जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने काम केले आहे. कोरोना काळातही त्यांनी सिनेसृष्टीला मदत केली आहे,” असेही प्रिया बेर्डेंनी यावेळी सांगितले.
लावणी करणाऱ्या स्त्रिया या अंगभर कपडे घालतात:
करोना काळात तुम्ही आमच्या तोंडाचे रंग बघून, टीव्ही बघूनच तुम्ही मनोरंजन करत होतात आणि तुम्ही आता जर याबद्दल बोलत असला तर याचा निषेध करावा वाटतो. नृत्य कलावंत, लावणी करणाऱ्या स्त्रिया या अंगभर कपडे घालतात, ते तुम्हाला वावडं वाटतं, ही मानसिकता कधी बदलेल मला काहीही माहिती नाही,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.”चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी तरी आपल्या नेत्यांना सांगा, टीका करतेवेळी थोडं तारतम्य बाळगा, असा सल्ला मी देणार होते. पण त्यांनीच जर पाठराखण केली, तर मला फार वाईट वाटते. तुम्हाला कलाकारांची काहीही जाण नाही,” अशी टीकाही प्रिया बेर्डे यांनी यावेळी केली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Actress Priya Berde criticized BJP leader Pravin Darekar over statement against Lok Kalakar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं