तब्बल ५५ वर्षानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल ५५ वर्षानंतर मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिली ३ वर्षे म्हणजे १९६१ ते १९६३ या कालावधीत मुंबईत झाले होते. परंतु, त्यानंतर आता थेट २०१८ साली हे अधिवेशन मुंबईत होत आहे. असे असले तरी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरका याबाबत शेवटपर्यंत संभ्रम कायम होता. अखेर सोमवारपासून ते मुंबईतच सुरू होत आहे.
विशेषम्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी नागपूर करार झाला होता. या करारानुसार विदर्भ संयुक्त महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला. त्या करारानुसार त्यावेळी विदर्भवासीयांच्या अनेक मागण्या होत्या, त्यात नागपूरला उपराजधानीचा दर्जा देणे आणि प्रत्येक वर्षी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे घेणे या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या.
त्या करारानुसार विधिमंडळाचे काही अपवाद वगळता हिवाळी अधिवेशन नेहमी नागपूर येथे होत असे. या पूर्वापार परंपरेला फाटा देत २०१८ चे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले होते. पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यास विरोधी पक्ष, सरकारमधील भागीदार असलेली शिवसेना आणि अनेक अधिका-यांचा विरोध होता. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हट्टाने ते अधिवेशन नागपूर येथे घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं