अति-उत्साही न्युज-दलाने काय मिळवलं? सरकारी जाहिराती, व्हिडिओ गेम ते लष्कराप्रती संवेदना?

नवी दिल्ली : परराष्ट्र संबंध राबवणारे अधिकारी हे शब्दप्रभू असतात तेव्हा जास्त चांगले असते. त्यामुळेच भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी परवा जेव्हा “म्हणजे बिगर-लष्करी” आणि “प्रतिबंधात्मक कारवाई” हे शब्दप्रयोग केले, तेव्हा ते आश्चर्यकारक नव्हते. तरीही अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्या शब्दवापरामध्ये खरोखरीच काही तरी उपयुक्त आणि अर्थवाही असं होतं. केवळ चलाख शब्दकलेच्या पलीकडे ते निवेदन आणि ज्या कारणाने ते केले गेले ते हवाई हल्ले, या दोन्ही दरम्यान एक दुहेरी दावा होता.
एक म्हणजे बालकोटवरील हल्ल्यामधून आणि परराष्ट्र सचिवांच्या निवेदनातून भारत सरकारच्या कठोर भूमिकेची सूचना केली गेली. म्हणजे सरकार पुलवामाला कडक प्रतिसाद देत आहे हा संदेश त्यात अधीरेखित करण्यात आला होता. वास्तविक भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल यांच्या शौर्यावर कोणताही संशय नाही. केवळ आजच नाही तर देशाच्या स्थापनेपासून भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलाचे भीम पराक्रम सर्वश्रुत आहेत. भारतीय लष्कर हे पराक्रमी असले तरी संवेदनशीलता हा देखील त्यांचा अधीरेखित करण्यासारखा सद्गुण आहे, जी यापूर्वच्या पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या युद्धात अधोरेखित झाला आहे.
परंतु, काळ बदलला आणि त्यापाठोपाठ नफेखोरी व सरकारी आणि निमसरकारी जाहिरातींच्या चिखलातून ‘न्युजदल’ देखील जन्माला आलं. त्याचा सर्वाधिक सुळसुळाट हा २०१४ पासून विकृतीरूपाने व्यक्त होताना दिसत आहे. परंतु, आज तर या सर्व गोष्टीने कहर केला आहे असच म्हणावं लागेल. अमेरिकेतील वर्ल्ड-ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्यानंतर अमेरिकन प्रसार माध्यमांमधील संवेदनशीलता संपूर्ण जगाने पहिली आहे. दुसरीकडे सरकारतर्फे किंवा भारतीय लष्कर किंवा वायुदलाने कोणताही अधीकृत व्हिडिओ प्रसिद्ध केलेला नसताना, भारतीय अतिउत्साही ‘न्युज-दलाने’ रात्रीपासूनच व्हिडिओ गेम आणि वातावरण निर्मितीसाठी कन्टेन्ट तयारच ठेवले होते का असं एकूण चित्र पाहायला मिळालं.
विशेष म्हणजे अफगाणिस्तानमधील तालिबानी गटांवर अमेरिकन लष्कराने केलेले हल्ले आणि तत्सम व्हिडिओ-गेम दिवसभर थेट ‘भारतीय एअर स्ट्राईक’ नावाने प्रसिद्ध करून बातम्या पेरल्या आणि त्यात सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी त्यांना ते पसरवण्यात मोलाची साथ दिली. त्यात नोटबंदीच्या काळात जशा खोट्या बातम्या पेरून प्रसार माध्यमांनी त्याचा संबंध थेट देशभक्तीशी जोडला आणि सत्ताधाऱ्यांचा खोटा अजेंडा राबवला तसाच काहीसा ठरवून केलेला प्रकार मागील २-३ दिवसांपासून सुरु आहे. नोटबंदी होण्यापूर्वीच गुजरातमध्ये जशा बातमी आधिच प्रसिद्ध झाली होती आणि त्याचे पुरावे देखील उघड झाले होते. त्यानंतर माहितीच्या अधिकारात गुजरातमधील दोन सहकारी बँकांचीच नावं उघड झाली होती. तसाच काहीसा प्रकार पाकिस्तनावरील कारवाईत घडताना अनुभवण्यास मिळाला.
नोटबंदीप्रमाणेच एअर स्ट्राईक सारखा, इतका मोठा गोपनीय विषय होता आणि त्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्री पाक व्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करण्यात आला. म्हणजेच २५ आणि २६ फेब्रुवारीच्या भर रात्री. परंतु त्याआधी ट्विटरवर १० तास आगोदरच ‘The Skin Doctor’ नावाच्या एका यूजरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका ट्वीटला उत्तर दिलं आहे. यूजरी माहिती मिळवली असता ते सैन्यात त्वचा तज्ज्ञाचं काम करतात. इम्रान खान यांनी २५ फेब्रुवारीला सायंकाळी ४:४७ वाजता ट्वीट केलं. त्यावर उत्तर देत ‘The Skin Doctor’ नावाच्या यूजरने ट्वीट केलं की, ‘इम्रान भाई त्याचा काहीही फायदा नाही आहे. आज रात्री असाही हल्ला होणार आहे. त्यामुळे काळजी घ्या.’ धक्कादायक म्हणजे त्या ‘The Skin Doctor’ नावाच्या एका यूजरला भारताचे म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी देखील फॉलो करतात. त्यानंतर हल्ला होतो आणि पाकिस्तानमधून दहशदवाद्यांची प्रेत कुठूनही दिसली नाहीत. परंतु, भारतासोबत सर्व व्हिडिओ पाकिस्तानमधून प्रसिद्ध होतात हे आश्चर्यकारक. त्यात २-३ दोन्ही देशांमध्ये गरमा गरमी होते आणि भारतात मोदीयुक्त वातावरण तयार होताच तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान शांतीची प्रवचनं देतात हे विशेष. भारतीय क्रिकेट संघविरुद्ध पाकिस्तान पराभूत झाला तरी त्यांच्या खेळाडूंची घरं जाळणारी जनता आणि १२ भारतीय लढाऊ विमान घरात घुसून देखील शांतता वार्ता करणारा पाकिस्तान पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.
यासर्व प्रकारातून भारतीय पत्रकारिता किती भयानक दिशेला जाते आहे त्याचा प्रत्यय येतो. एकूणच पेड पत्रकारितेच्या नावाने चाललेला प्रकार भारतीय लोकशाही एका भयानक अराजकतेकडे घेऊन जात आहे. आजच कर्नाटक भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी एअर स्ट्राईकमुळे भाजपच्या लोकसभेत कमीत कमी २० जागा वाढतील असं विधान केला आहे. तर राष्ट्रीय संकटाचा आव आणून भाजपचे सर्वच नेते मंडळी लोकसभा प्रचारात याच भारतीय लष्कराच्या शौर्याच्या नावाने मतपेटी वाढवत आहेत. एकूणच वातावरण असं करून ठेवलं आहे की जो आमच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही ठरेल. पण माध्यमांनी किमान भारतीय लष्कर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा तरी अंतकरनातुन विचार करायला हवा होता. कारण आज ना उद्या प्रसार माध्यमांचं बिंग देखील पुराव्यानिशी फुटल्याशिवाय राहणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं