VIDEO; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणाबाजी..एक मराठा..लाख मराठा

बारामती : बारामतीतील `गोविंदबाग`या शरद पवारांच्या बंगल्यासमोर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या धरला. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आंदोलनकर्त्यांमध्ये सामील झाले. त्यांनी थेट ‘एक मराठा…लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.
मागील काही दिवसांपासून बारामतीमध्ये हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर थेट शरद पवारांच्या बंगल्यासमोर आंदोलकांनी ठिय्या धरला. त्यानंतर १०:३० च्या सुमारास अजित पवार हे तेथे उपस्थित झाले आणि त्यांना थेट रस्त्यावर खाली बसत आंदोलनात सहभाग घेतला.
त्यांनंतर अजित पवारांनी स्वतः हातात माईक घेतला आणि मराठा आंदोलकांच्या घोषणाही त्यांनी दिल्या. एक मराठा..लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी आंदोलकांनी दिलेले निवेदन स्वीकारले आणि तेथून निघून गेले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं