भारतातील सर्व बँकांची जवाबदारी मोदींची नाही : अमित शहा

नवी दिल्ली : एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी घोषवाक्य देत सत्तेत आलेलं मोदी सरकार आता जवाबदाऱ्या झटकू लागलं आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी विषयी बोलताना अमित शहा म्हणाले की, त्या बॅंकेनें गुन्हा दाखल करण्यापूर्वीच नीरव मोदीने देशातून पलायन केले होते असे उत्तर त्यांनी या मुलाखती दरम्यान दिले.
देशातील सर्वच बँकेत होणाऱ्या घोटाळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जवाबदार नसल्याचे विधानही त्यांनी केले. मोदी सरकार भ्रष्टाचार विरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे विधानही त्यांनी केले. काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे नीरव मोदी प्रकरणावरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, राहुल गांधींच्या आरोपांची आणि भाषणाची दखल पत्रकार घेत असतील परंतु जनता घेणार नाही, कारण जनतेला सर्व ठाऊक आहे. आमच्या मोदी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे डाग नसल्याचे सुद्धा ते म्हणाले.
काँग्रेसच्या काळात आम्ही आरोप केले नव्हते तर ते कॅगच्या तपासातून उघड झाले होते तर काही कोर्टातील जनहित याचिकेमुळे समोर आले होते. जर काँग्रेस अध्यक्षांना वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावे असा सल्ला सुद्धा अमित शहा यांनी मुलाखती दरम्यान दिला. फ्रान्सच्या राफेल फायटर जेट करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे ते म्हणाले.
मित्र पक्षांनी आमच्या बरोबर राहावं असं आम्हाला वाटतं, पण तेलगू देसम पार्टी आणि शिवसेना यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वतःच घेतलेला आहे. विश्वासदर्शक ठराव आम्ही सहज जिंकू तसेच २०१९ मधील निवडणुकीत आम्ही २०१४ पेक्षा ही अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं