कृष्णकुंज'वर आता दोन राजकन्या, अमित व मिताली यांचा आज मराठमोळा विवाह सोहळा

मुंबई : कृष्णकुंज हे महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आज अमित आणि मिताली यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सजवण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासूनच घराचा परिसर प्रकाशाच्या झगमगाटात उजळून निघाला आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त कृष्णकुंजवर यापुढे उर्वशी आणि मिताली अशा २ राजकन्या असतील. राजकारणातील एक मोठं कुटुंब असलं तरी साधेपणा हा त्यांच्या कुटुंबातील उत्तम गुण आहे.
मिताली बोरुडे ही उच्चशिक्षित असून तिने यापूर्वीच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिच्यासोबत फॅशन डिझाईन’मध्ये स्वतःचा ब्रँड सुरु केला आहे. उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या दोघी एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि आता अमित ठाकरे यांच्याशी विवाह झाल्याने मिताली सुद्धा याच घरातील कन्या होणार आहेत.
एकीकडे राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही सक्रिय राजकरणात आहेत, तर दुसरीकडे उर्वशी आणि मिताली या घरातील दोन्ही मुलींनी फॅशन डिझाईन’मध्येच काही करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळेच त्यांनी ‘द-रॅक’ हे स्वतःच फॅशन क्षेत्रातील ब्रँड निश्चित केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं