अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत अंधेरी पूर्व भाजपकडून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पूर्व येथील कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल आणि त्याची समाजसेवी संस्था ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ यांच्या सहकार्यातून भव्य मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती होती.
दरम्यान, या सांस्कृतिक कार्यक्रमांना स्थानिक महिलांची विशेष उपस्थिती होती. यावेळी एका भव्य स्टेजवर निरनिराळ्या मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवकालीन देखावे आणि ऐतिहासिक कार्यक्रमावर अधिक भर देण्यात आला होता. अंधेरी महोत्सव हा याच मतदासंघातील बहुचर्चित कार्यक्रम दरवर्षी भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांच्याकडून आयोजित केला जातो आणि ती सुद्धा स्थानिक लोकांसाठी एक पर्वणीच असते.
दरम्यान, या कार्क्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस, आमदार आशिष शेलार, नगरसेवक मुरजी पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल आणि इतर मान्यवरांची सुद्धा विशेष उपस्थिती होती. जीवन ज्योत प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या कामातून अंधेरी पूर्वेकडील सर्वच धर्मातील आणि समाजाच्या लोकांमध्ये ज्ञात झालेले भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे तगडे उमेदवार म्ह्णून शिवसेना आणि काँग्रेससोबत दोन हात करतील यात शंका नाही. त्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून महिला आणि तरुणांना सुद्धा पक्षाकडे मोठ्याप्रमाणावर आकर्षित केले जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं