FDI नियम; फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉनचे मेगा सेल बंद

नवी दिल्ली : ईकॉमर्स क्षेत्रातील जाईंट फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉन १ फेब्रुवारीपासून निरनिराळ्या दिवसांच्या निमित्ताने आयोजित करणारे मेगा सेल यापुढे बंद करावे लागणार आहेत. दिवाळी, दसरा, नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा अनेक महत्वाच्या दिवशी ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी खरेदीवर मोठी सूट देऊन एकूण विक्री वाढवायचे. परंतु, सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे यापुढे या कंपन्यांना हे सर्व येत्या १ फेब्रुवारीपासून करता येणार नाही .
कारण नव्या नियमानुसार या कंपन्यांनी स्वतःच्या नावाने बनवलेली उत्पादनं त्यांना यापुढे केवळ स्वतःच्या वेबसाईटवर विकता येणार नाहीत. कारण यापुढे ती उत्पादनं त्यांना इतर वेबसाईटवर सुद्धा विकण्यासाठी खुली करावी लागतील. नव्या नियमानुसार यापुढे एक्सक्लूसिव’च्या नावाने स्वतःची उत्पादनं बनवून ती केवळ स्वतःच्या ईकॉमर्स साईट्स वरून विकता येणार नाहीत, असा नवा नियम आहे.
सरकारने एफडीआय नियमावलीत केलेल्या नव्या बदलानुसार आधी तीच उत्पादनं इतर साईट्स’ला सुद्धा विकण्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागतील असा नियम आहे. त्यामुळे यापुढे हा नियम सर्वांना अंमलात आणणे बंधनकारक आहे. परंतु, प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या वृत्तानुसार छोट्या व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे बदल केले गेले आहेत, असा आरोप करण्यात येतो आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं